बाणेगाव येथे 1 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्याला भरीव निधी.

पाथरी प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी

परभणी : पाथरी मतदारसंघातील शेवटच्या गावांपर्यंत विकास पोहोचावा, यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. अनेक शेतरस्ते स्वखर्चाने तयार केले, तसेच कासापुरी, नाथ्रा, मंजरथ, बानेगाव या गावांना माजलगावला जोडणारा रस्ता दळणवळणासाठी खुला केलाअसे उद्गार शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान यांनी बाणेगाव ता.पाथरी येथील एक कोटी रुपयांच्या विविध विकास कामाच्या भुमिपुजन प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना,ते म्हणाले की उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी मिळत असून, आगामी काळातही प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.सईद खान हे गेल्या काही वर्षापासून कुठल्याही राजकीय पदावर नसतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यात व ग्रामीण भागात भरपुर निधी आणुन विकास कामे करत असुन अल्पावधीतच त्यांनी जनाधार असलेल्या मजबूत कार्यकर्त्यांची फळी उभारली व गेल्या विधानसभा निवडणुकीत पाथरी शहरात मतदार संघात तुल्यबळ मतदान घेऊन त्यांची मतदारसंघातील लोकप्रियता दाखवून दिली आहे.

कार्यक्रमास नाना टाकळकर,पप्पू भैय्या घांडगे, विठ्ठल रासवे,बाळासाहेब झिंझान,उध्दव झुटे,प्रभु बाराटे, कल्याण अडाव,प्रदिप काळे,माऊली क्षिरंग,आबा कोल्हे, विष्णु काळे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल