श्री गुरु तेग बहादूर!

“कधीकधी एखाद्या युगपुरुषाचे अस्तित्वच इतिहासाची दिशा बदलते. असेच एक महान योद्धा, एक महान संत, ज्यांचे नाव घेताच श्रद्धेने मस्तक झुकते ते म्हणजे ‘हिंद की चादर’ – श्री गुरु तेग बहादूर! ही केवळ कथा नाही, हा एक प्रकाश आहे, जो अनंत काळापर्यंत उजळत राहील.”
“अमृतसर नगरी, १६२१ साल. एका साध्यासुध्या, पण तेजस्वी घरात एक बालक जन्मला – त्यागमल! मात्र नियतीने त्याच्या कपाळावर शौर्य आणि त्यागाचा शीरपेच आधीच बांधला होता. अवघ्या तेरा वर्षांचा असताना, त्याने मुघलांच्या सैनिकांशी युद्ध केले आणि त्यागमल बनला – तेग बहादूर!”
“त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा सत्याच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी समर्पित होता. त्यांनी देशभर प्रवास केला – प्रयाग, बनारस, पटना, आसाम! एका हातात तलवार, दुसऱ्या हातात मानवतेचा दीप. शौर्य आणि साधनेचा अद्वितीय संगम!”
“मात्र, सत्याचा मार्ग नेहमीच सोपा नसतो. जेव्हा अन्याय वाढू लागतो, तेव्हा त्याला संपवण्यासाठी एखादा दीप असावा लागतो. औरंगजेबाच्या आदेशाने हिंदू धर्माचे जबरदस्तीने धर्मांतर सुरू झाले. हजारो काश्मिरी पंडित विवश झाले. आणि मग, एक प्रकाश त्यांना दिशा दाखवण्यासाठी उभा राहिला ते म्हणजे गुरु तेग बहादूर!”
“‘जर धर्म वाचवायचा असेल, तर कोणीतरी बलिदान द्यावे लागेल!’ या शब्दांनी इतिहास घडवला. आणि गुरुजींनी स्वतः पुढे होऊन आपल्या रक्ताने धर्मरक्षणाची शपथ घेतली.”
“औरंगजेबासमोर उभा ठाकलेला तो एकच चेहरा – स्थिर, शांत, निर्भय! ‘धर्म स्वीकारा, चमत्कार दाखवा किंवा मृत्यू पत्करा!’ – औरंगजेबाचे आव्हान. पण गुरुजी म्हणाले, ‘माझे शीश कापू शकता, पण माझे तत्व नाही!’ आणि मग… २४ नोव्हेंबर १६७५! एक तलवार चमकली, आणि एक अमर दीप पुन्हा तेवत राहिला.” “आजही चांदणी चौकातील गुरुद्वारा शीशगंज साहिब त्या त्यागाची साक्ष देतो. त्या रक्ताच्या थेंबाने मानवतेचा इतिहास लिहिला. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान केवळ धर्मासाठी नव्हते, ते स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या संरक्षणासाठी होते!” “आजही, आपण अन्यायाच्या विरोधात उभे राहायचे असेल, सत्यासाठी लढायचे असेल, तर गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाची आठवण ठेवली पाहिजे! कारण इतिहासाने सिद्ध केले आहे – जे अन्यायाविरुद्ध लढतात, ते कधीही हरत नाहीत!”
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल