आष्टी पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्यास ठोकल्या बेड्या

आष्टी/- परतूर तालुक्यातील आष्टी पोलिसांनी काल शनिवारी दिनांक २९ रोजी गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास शिंदे टाकळी ता. सेलु येथे सापळा रचुन पकडले असून, त्याच्या ताब्यातून २० हजार रुपये किमतीचा एक जुना वापरात असलेला गावठी कट्टा जप्त केला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, आष्टी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे हे सहकारी-कर्मचाऱ्यांसह शनिवारी रात्री गस्तीवर असतांना शिंदे टाकळी येथे एकजण गावठी कट्टा सोबत घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सदरील ठिकाणी किमतीया भगझीन सुटलेला वापरातील गावठी कट्टा २० हस्तगत करुन एकास ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी फौजदार गोपीनाथ कांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अशोक सदाशिव पवार (रा. शिंदे टाकळी, ता. सेलु) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे हे करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, फौजदार अजित चाटे, गोपीनाथ कांदे, जमादार रामदास शेळके, शाम गायके, राणा पांढरे, दिपक सोनूने, दिपक पवार, दिगंबर बादाडे, भरत ढाकणे, विनोद वाघमारे यांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल