परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर दि.30 मार्च 2025- भारतीय बौद्ध महासभा जालना यांच्या वतीने परतुर येथे बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपन्न झाली. परतुर येथील साठे नगर सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी मुख्य परीक्षक आद. बापू निकाळजे साहेब मुंबई, परीक्षक 1 म्हणून युवराज मोरे नांदेड, 2 राजेशजी सदावर्ते जालना पूर्व, उद्घाटक महेंद्रजी बनकर जालना पश्चिम, यांची मुख्य उपस्थिती होती. भारतीय बौद्ध महासभेच्या परंपरेप्रमाणे महापुरुषांचे स्मरण करून बौद्धाचार्य परीक्षेची सुरुवात करण्यात आली. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र पानवले मधुकर खरात भास्कर साळवे सुदाम मस्के सुभाष ठोके सुरेश लहाडे अंकुश लांडगे हेमंत पहाडे विमलताई शिरसाट दामोदर जी मगरे, अशोक बनसोडे, सचिन हिवाळे हिवाळेताई, दत्ता वाघमारे इत्यादींनी प्रयत्न केले. याप्रसंगी बाबुराव हिवाळे (समाज गौरव पुरस्कार) प्रा. सिद्धार्थ पानवले (समाज रत्न पुरस्कार), सुरेश गायकवाड (समाज रत्न पुरस्कार) पुरस्कार प्राप्त यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला..
याप्रसंगी बाबुराव हिवाळे (समाज गौरव पुरस्कार) प्रा. सिद्धार्थ पानवले (समाज रत्न), सुरेश गायकवाड (समाज रत्न) पुरस्कार प्राप्त यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






