मिशन नवोदय अकॅडमी जालन्याचे एकवीस विद्यार्थी ‘नवोदय’साठी पात्र….

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 

जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून या परीक्षेत मिशन नवोदय अकॅडमी जालना येथील विद्यार्थ्याने दैदीप्यमान कामगिरी करत यश मिळविले आहे. या अकॅडमी चे एकवीस विद्यार्थी नवोदयासाठी पात्र ठरले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या इयत्ता ६ च्या

प्रवेश प्रक्रियेसाठी नवोदय विद्यालयामार्फत आयोजित केलेल्या परीक्षेचा निकाल दि. २५ मार्च रोजी जाहीर झाला असून यामध्ये मिशन नवोदय अकॅडमी जालन्याच्या विदयार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत यश मिळविले.एकवीस विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

शैक्षणिक वर्ष 2024-25 जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत जालना परभणी बुलढाणा यवतमाळ जळगाव पुणे संभाजीनगर या जिल्ह्यातून मिशन नवोदय अकॅडमीचे

 एकूण 21 विद्यार्थी नवोदय पात्र 

अतिशय कठीण तयारी विद्यार्थ्यांनी केली होती. मिशन नवोदय अकॅडमीचे मागील 11 वर्षात 236 विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र झाले आहेत , सैनिकी परीक्षेत 15 विद्यार्थी पात्र झाले आहेत, शिष्यवृत्ती परीक्षेत 180 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र आणि 80 विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात प्रवेश पात्र, तसेच यावर्षी सरस्वती विद्या अकॅडमी लोणावळा 16 विद्यार्थी प्रवेश पात्र, या पूर्वी हि अनेक परीक्षेत गुरुकुल चे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. नाही यश मिळवण्यासाठी मिशन नवोदय अकॅडमीचे संचालक श्री .परमेश्वर होळकर सर , गुरुकुल चे मार्गदर्शक श्री बाबासाहेब होळकर सर, श्रीमती अलका बाबासाहेब होळकर मॅडम आणि त्यांचे सहकारी शिक्षक श्री .उघडे सर, श्रीमती मिसाळ मॅडम ,श्रीमती रेणुका सरोदे मॅडम ,श्री स्वप्निल सर, श्री विलास रोकडे सर ,श्रीमती जयश्री मॅडम, श्रीमती गायकवाड मॅडम, आणि संपूर्ण स्टाफ हे मुलांना शिक्षण ,संस्कार, यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करत आहेत. दि. 15 एप्रिल पासून निवासी बॅच सुरू होत आहे .निवासी व ऑनलाईन क्लास घेणारे महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी आहे .

या यशाबद्दल अकॅडमी चे संचालक परमेश्वर होळकर आणि अलका बाबासाहेब होळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.ग्रामीण भागातून शहरात येऊन शिक्षण घेऊन उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तरी ज्या विद्यार्थ्यांना मिशन नवोदय अकॅडमी जालना येथे प्रवेश घ्यायचा असल्यास संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे.संपर्क 7499602323,954529943,9604388479

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल