जिंतूर (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी
दिनांक 28 मार्च 2025 रोजी गटशिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती जिंतूर द्वारा आयोजित निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय कार्यप्रेरणा शिक्षण परिषद, पारितोषिक वितरण आणि गुणगौरव सोहळा श्री राधाकृष्ण मंगल कार्यालय ग्रीन पार्क -2 जिंतूर येथे मा. ना. सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी गुणवंत विद्यार्थी आणि असे विद्यार्थी घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे उपक्रमशील ज्ञानदाते शिक्षक यांचे विशेष कौतुक केले . शिक्षक हे उद्याचे उज्वल भविष्य घडवत असतात. सक्षम राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे. समाजजीवन आणि संपूर्ण समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक विकास करावयाचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा महत्त्वाच्या आहेत . अशा शाळांना सर्व प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा मिळवून देणे यासाठी शासन प्राधान्याने काम करत आहे. .

प्रधानमंत्री PM श्री शाळा, मुख्यमंत्री CM श्री शाळा भौतिक सोयीसुविधेसह विविध उपक्रमाने आदर्श शाळा निर्माण होत आहेत. याच धरतीवर आधारित परभणी जिल्ह्यात पालकमंत्री श्री शाळा निर्माण करणे हे माझे ध्येय आहे . यासाठी मी पालकमंत्री श्री शाळा विकास आराखडा तयार करणार आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात काम करण्याचा माझा मानस आहे . मा. मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासन शिक्षणाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात, दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे अशी शासनाची आग्रही भूमिका आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून यासाठी विविध उपक्रम नियोजित केले जात आहेत . या विविध उपक्रमांमध्ये माझा परभणी जिल्हा सर्व बाबतीमध्ये अग्रेसर आहे. याचा मला अभिमान आहे.
विशेषत: जिंतूर तालुक्यात या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम, कृती कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले . या वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या शालेय शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपल्या कर्तुत्वाचा आणि गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात करताना मला विशेष आनंद होत आहे. या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी मी 400 स्मृतीचिन्ह आणि 2000 प्रमाणपत्र तयार करून घेतले.

या भव्य कार्यक्रमात हे वितरण करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून विशेष समाधान वाटले….अत्यंत व्यस्त जीवन शैली मधून देखील माझ्या जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सन्मान करायला मला गेलेच पाहिजे या आंतरिक ओढीने मी या कार्यक्रमास उपस्थित राहिले…. या पुढील काळात देखील सर्व शिक्षकांनी बदलत्या काळानुसार आपल्या भूमिका, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे ज्ञानवंत, गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे काम सुरू ठेवावे. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. मा. मुख्यमंत्री शिक्षण आणि शिक्षक यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.

या भव्य कार्यक्रमात एकूण 1500 विद्यार्थी 750 शिक्षक,विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित व्यापारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमासाठी राजेश सरवदे तहसीलदार जिंतूर, सुभाष मानकर गटविकास अधिकारी जिंतूर, दंडवते मुख्याधिकारी नगरपालिका जिंतूर, गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे , नारायण मुंडे, मा. जि प उपाध्यक्ष प्रभाकर वाघीकर, गोविंद थिटे, प्रताप देशमुख, संतोष कदम, शिवाजी खिस्ते केंद्रप्रमुख रवींद्र भताने , प्रकाश पांडे, ओमप्रकाश बाहेती,केशव घुगे, दिलीप रेंगे,मारुती घुगे, पांडुरंग भांबळे, दिनकर घुगे, देवानंद सावंत, मनोज तोडकर, राजेंद्र ढाकणे, लक्ष्मण टाकणसार, शंकर दांडगे, सोपान खताळ,दत्तराव पोले, तुकाराम चव्हाण,शंकर खिस्ते, मधुकर घनसावंत हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी तर सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी, देवानंद सावंत, जयानंद मत्रे,माधव गडदे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर नालंदे, रवी राठोड, सचिन चव्हाण, योगिता संगवई, रत्नमाला तोडकर, नितीन पेठे, हनुमान गायकवाड,सुनील फड, श्रावण वैरागड, शंकर दांडगे, शंकर माने, सचिन हजारे,शिवाजी टेकुलवार,अमोल स्वामी, सुनिता मगर, अलका खिल्लारे, गजानन कुरे यांच्यासह सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






