स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कार्यवाही आष्टी दीपक दवंडे व रवी आखाडे यांचे आष्टी शिवारातील पत्र्याचे शेडच्या मागे देशी व विदेशी दारूच्या बाटल्या एकूण 5,500 रूपये किमतींचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळुन आले.

तर पिंपळी धामणगाव येथे आरोपी मच्छिंद्र मारुती पवार हा त्याचे पत्र्याचे शेडमध्ये मौजे पिंपळी धामणगाव येथे देशी व विदेशी दारूच्या बाटल्या एकूण 3,400 रूपये किमतींचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगताना मिळुन आल्याने

आष्टी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश सुरवसे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. अजित चाटे, पोलीस कॉन्स्टेबल राणा पांढरे, डीगंबर बादाडे, भरत ढाकणे यांनी छापा टाकून कॉन्स्टेबल भरत केदारनाथ ढाकणे यांचे सरकार तर्फे फिर्यादी वरून नमूद आरोपीवर पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






