परतूर तालुक्यातील आष्टी येथे मुलाने आत्महत्या केल्याचे पाहताच वडिलांनी घेतला गळफास
आष्टी प्रतिनिधी : वडील दारू प्राशन करीत असल्याने घरात नेहमी आई-वडिलांमध्ये वाद होत असे. यामुळे मुलगा वक वडिलांना दारू पिऊ नका, असे नेहमी सांगत असे. परंतु वडील ऐकत नसत. सकाळच्या सुमारास वाद झाल्याने रागाच्या भरात मुलाने शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह घरी आणल्यानंतर नातेवाईक म्हणतील माझ्यामुळेच मुलाने आत्महत्या केली. या नाराजीतून वडिलांनीही दुसऱ्या घरात जाऊन आत्महत्या केली. ही घटना परतूर तालुक्यातील आष्टी येथे सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. विशाल बालासाहेब मोरे (२२) आणि बालासाहेब नामदेव मोरे (४२) अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत. आठवडाभरापूर्वीच कर्नाटक येथे ऊसतोडी करून हे कुटुंब आष्टी गावी परत आले होते. वडील दारू पित असल्याने वाद होत असल्याने कुटुंबात नेहमी भांडण होत असे. आई-वडिलांमध्येही यामुळे वाद व्हायचा. वारंवार होत असलेल्या भांडणामुळे मुलगा तणावात येत. असे. दारू पिऊ नका, असे मुलगा वडिलांना वारंवार सांगायचा. परंतु वडील ऐकत नसत. सोमवारी सकाळीसुद्धा वाद झाला. यानंतर रागाच्या भरात मुलाने शेतात जाऊन गळफास घेतला. दिवसभर मुलगा घरी न आल्याने शोधाशोध केली असता, मुलाचा मृतदेह शेतात आढळून आला. मृतदेह घरी आणला असता, नातेवाईक आपल्यालाच बोलणार, माझ्यामुळेच मुलाने आत्महत्या केली, या नैराश्यातून वडिलांनीही घरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

बालासाहेब मोरे

विशाल मोरे
एकाचवेळी काढली दोघांची अंत्ययात्रा
एकाचवेळी पिता-पुत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. मुलाचे लग्न झालेले नव्हते. एकच मुलगा असल्याने या घरातील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






