शैक्षणिक वर्षपूर्ती होऊनही जि.प.च्या विद्यार्थ्यांना मिळेना दुसरा गणवेश

प्रतिनिधी /आष्टी

जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश देण्याचा निर्णय झाला होता. त्यातील एक गणवेश स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला. आता शैक्षणिक वर्ष संपत आले तरी दुसरा गणवेश अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज एकाच गणवेशात शाळेत जावे लागत आहे.

परतूर तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद प्रशाला, नुतन कन्या, नुतन मराठी, नुतन ऊर्दू अशा तीन शाळांतील १३०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून चालू शैक्षणिक वर्षात खुला व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलांना प्रत्येकी दोन गणवेश व सर्व मुला-मुलींना बूट व पायमोजे मोफत मिळणार होते. या योजनेतून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळणार होता. परतूर तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना एक गणवेश स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला. प्रजासत्ताक दिनाआधी मिळणे आवश्यक होते. मात्र आता शैक्षणिक वर्ष संपत आले तरी दुसरा गणवेश अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्याथ्यर्थ्यांना दररोज एकाच गणवेशात शाळेत जावे लागत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना स्काऊट तसेच गाईड असा एक गणवेश अनिवार्य करण्यात आला.मात्र, गणवेशच शैक्षणीक वर्षात आला नसल्याने विद्यार्थी स्वसंशिस्त लावणाऱ्या स्काऊट गाईड या चळवळीपासून मुकले आहे. हे विद्यार्थ्यांचे एका प्रकारे शैक्षणीक नुकसानच झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांतून उपस्थित होत आहे. दरम्यान, दरवर्षी शालेय गणवेशाच्या बाबतीत नवीन नियम येत आहेत. सुरूवातीला शाळांना पैसे देत गणवेश खरेदी करावा लागत होता. त्यानंतर एजंसीकडून खरेदीचे आदेश दिले.

⭐ जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे शासनाचे दुर्लक्ष

गणवेशाची मागणी केलेली आहे

• शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत गणवेशाची मागणी संदर्भात ठरावा घेऊन तो गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. या बाबत सतत पाठपुरावाही सुरू आहे. वरीष्ठ पातळीवरून गणवेशाचा निर्णय घेण्यात आल्याने पुरवठादारांनी जेव्हा उपलब्ध करून दिला तेव्हा विद्यार्थ्यांच्या हाती दिला जाईल. कलीम मिर्जा बेग, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्रा. नूतन ऊर्दू, आष्टी

गुरुवारपर्यंत मिळतील

• दुसऱ्या गणवेशाच्या संदर्भात आष्टी येथील जिल्हा परिषद केंद्राच्या केंद्र प्रमुखांशी संपर्क केला असता गट शिक्षणाधिकारी स्तरावर गणवेश सर्व मुला-मुलींना बूट व पायमोजे प्राप्त झाले असून आष्टीसह कोकाटे हदगाव, लोणी केंद्रात गुरुवारी वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कापड घेण्याच्या हट्टापायी झाला वर्षभराचा विलंब

• कापड शासन खरेदी करून देणार त्यानंतर महिला विकास महामंडळाच्या माध्यमातून गणवेश शिवुन घेण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. यातील एक गणवेशाचा कापड खरेदीसाठी अर्धे वर्ष वाया गेले. त्यानंतर दिलेल्या वेळेत माविम कडून गणवेश तयार झाले नाही. यामुळे मोठा विलंब झाला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल