वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी चे वतीने आज पंचायत समिती परतूर येथे अनुपस्थित कर्मच्याऱ्यांच्या खुर्ची ला हार घालून गांधीगिरी आंदोलन.

प्रतिनिधी राम राठोड परतुर
मो.7620288187

आज दिनांक १०/३/२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी चे वतीने परतूर पंचायत समिती मध्ये शिष्टमंडळ विविध प्रश्न उपस्थित करण्याकरिता बहुसंख्येने पोहोचले .परतूर पंचायत समिती मधे सध्या प्रचंड गोंधळ , अनागोंदी चालू आहे.सर्वसामान्य घरकूल लाभार्थी बिला साठी खूप परेशान आहेत. पैसे दिल्याशिवाय बिले अदा केले जात नाहीत.शेतकऱ्यांचे विहिरीचे बिल काढायला लाभार्थी पैसे दिल्याशिवाय बिले अदा केले जात नाहीत. ग्रामपंच्यायातीत प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे.

सत्ताधारी ग्रामपंचायती मध्ये विरोधकांना त्रास दिला जात आहे. विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. शासनाने ५ दिवसाचा आठवडा केला त्या अनुसंह्यंगाने अधिकारी सकाळी ९:४५ ते ६:१५ पर्यंत कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक आहे असे असताना पंचायत समितीत अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर असतात. सोमवारी कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे असताना देखील आज गटविकास अधिकारी यांच्या सह अनेक अधिकारी कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन आणि हार घालून गांधीगिरी करून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. परतूर पंचायत समिती मध्ये सावळा गोंधळ सुरू आहे.

याचा वंचित बहुजन आघाडी ने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला कारभार सुधारा नाहीतर वंचित बहुजन आघाडी या पुढे अधिकाऱ्यांना वंचित स्टाईलने आंदोलन करेल अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी मा नगराध्यक्ष मंगलताई पाणवले, येणूताई लांडगे, सुमनताई गरड, मीराताई पहाडे, उषा ताई पहाडे, वर्षा सोनपसारे, रामप्रसाद थोरात सर , पडघाणे ताई ,रवींद्र भदर्गे, दिपक वक्ते , राहुल नाटकर, महादेव पैठणे , स्वप्नील पहाडे, प्रशांत वाकळे, गौतम मुंढे , बाळाभाऊ भालेकर,भगवान वाडमारे, विठ्ठल तरासे ,भगवान वाघमारे , गौतम गरड, अशोक वाघमारे ,रामचंद्र पाणवले ,चोखा नाना सौंदर्य ,जमीर भाई शेख,मिलिंद मगर ,अर्जुन शेजुळ, सुरेश लहाने सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल