स्वराज्य वार्ता / राम राठोड
प्रतिनिधी/आष्टी :- परतूर तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथील शेतकऱ्याच्या घरी धाडशी चोरी होऊन जवळपास दोन लाखांचे दागिने आणि पाच लाख रोख रुपये चोरीला गेले. यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्राह्मणवाडी येथील शेतकरी राम मोरे हे देव दर्शनाला गेल्याने यांच्या घरी तारीख ५ मार्च रोजी रात्री त्यांचे आई वडील नेहमीप्रमाणे जेवन करून झोपले होते.अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे चॅनेल गेटचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातुन 2,07,000 सोन्याचे तर 10,400 चांदी तर 5,00,000 रोख असा एकूण सात लाखाचा ऐवज चोरांनी लंपास केला.
राम मोरे नेमकेच घटनेच्या दिवशी देव दर्शनाहून सकाळी घरी येतांच चोरीचा प्रकार समोर आला. यानंतर राम मोरे यांनी आष्टी पोलिसात तक्रार दाखल केली असता ठाणे प्रभारी पिआय सुरवसे यांनी पंचनामा करून पुढील तपास पोउपनि.अजित चाटे साहेब यांच्याकडे दिला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






