स्वराज्य वार्ता प्रतिनिधी :- अशोक साबळे.
परतूर: खांडवी तालुका परतुर या ठिकाणी कामगार आयुक्त युनियनची शाखेची स्थापना झाली आहे. अध्यक्ष सुखदेव बरकुले, उपाध्यक्ष बाळासाहेब बरकुले, सचिव तुकाराम भारसाकळे, सल्लागार अर्जुन भारसाकळे यांची निवड झाली आहे. कामगार एकता युनियन मागील 8 वर्षापासून विकासात्मक / शासन निर्णयातून वंचित राहिलेल्या घटकांसोबत कार्यरत आहोत. घरेलू महिला कामगार,पथविक्रेते, आणि नाका कामगार प्रस्थापित असंघटीत कामगार वर्गाला, कामगारांच्या अधिकाराची जाणीव करून देणे आणि अधिकार समजावून त्यांचे सक्षमीकरण करणे, ही महत्वाची भूमिका पार पाडत आहे. लोकांचे संघटन करून लोक संघटनेची बांधणी करणे आणि लोकानी लोकांसाठी संघटनारूपी एकत्र येऊन सुरु असलेल्या विकासाची व बदलावाची चर्चा, संवाद, विचार घडवून आणणे हा आमचा उद्देश आहे. उपस्थिती कामगार एकता युनियन तालुका अध्यक्षा विठ्ठल भारसाखळे जिल्हाध्यक्ष सुखदेव घोडे रतीव पाटील आणि सतीश लोंढे यांनी निवड झालेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले..
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






