आष्टीत नाल्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नागरिकांना रहदारीस प्रचंड त्रास

 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील मुख्य रोडवरील आझाद चौकात नाली तुंबली आहे. यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यातील दुर्गंधी व घाणीमुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आष्टी ही मुख्य बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतू, स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
आष्टी येथील खंडेश्वर मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे. परंतू, रस्त्यावरच घाणीचे साम्राज्य असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी येऊन चिखल होऊन अनेक भाविक या रस्त्यावरुन ये-जा करीत असतांना पडत आहेत.

आष्टी हे बाजारपेठेचे गाव असलेल्याने साध्या नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नाल्यांची साफसफाई होत नसल्याने तुंबलेल्या नाल्यांमधून पाणी रस्त्यावर येत आहे. यातून वाट काढताना ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. तर पाणीपुरवठाही विस्कळीत झाल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आष्टी येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्ष कारभारामुळे ठिकठिकाणी नाल्या तुंबणे कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विस्कळीत असलेला पाणीपुरवठा नऊ वर्ष उलटूनही सुरळीत होत नाही. आता तर उन्हाळ्याची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. पाणी महिन्यातून एकदा मिळत आहे. नियमित पाणीपुरवठा नसल्याने बोअरवेलवरच पाण्याची मदत होत आहे. कडक उन्हाळ्यात पाणीपातळी खालावत असल्याचा दर वर्षीचा आष्टीकरांचा अनुभव असल्याने नाविलाजाने नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ श्रीष्टी येथून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची व नाल्याची कचऱ्याची साफसफाई वेळेवर करण्याची मागणी आष्टी ग्रामस्थांकडून होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल