प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल यांच्या कार्यालयीन भेट या उपक्रमांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्याची भेट

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी स्कूलच्या कार्यालयीन भेट या उपक्रमांतर्गत आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी कार्यालयामध्ये प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल मार्फत इयत्ता 1ली ते 10वी मधील विद्यार्थ्यांची कार्यालयात भेट देण्यात आली. त्यावेळी उपस्थित निलेश चौके (शाखा व्यवसथापक), निखिल मुदिराज, संतोष गीते, सुनील गिरी, अमोल सुरवसे, या बँक अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत मनसोक्तपणे संवाद साधला. 

त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी ही त्यांच्या मनातील प्रश्न हे बँकेतील व्यवस्थापक यांच्यासमोर मांडले त्यांनीही अगदी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार कसे चालतात, बँक खाते कसे उघडतात, पैसे जमा कसे करतात, आर.टी.जी.एस कसे करतात.

तसेच बँकेमध्ये काम करण्यासाठी मुलांना कुठली परीक्षा द्यावी लागते, अशी अनेक माहिती बँक मॅनेजर यांनी आपल्या संवादातून व मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिली.

 त्यावेळी उपस्थित शाळेच्या प्रिन्सिपल अर्चना मॅडम, व सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व बँक कर्मचारी याचे आभार मानले. तसेच मागील वेळी पोलीस स्टेशन भेट हा उपक्रम या अंतर्गत घेण्यात आला होता.

या कार्यक्रमाची दखल घेत बँक कर्मचारी, पालक वर्ग, गावकरी मंडळी व उपस्थित इतर नागरिक यांच्याकडून शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक पाहायला मिळाले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल