स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी प्रतिनिधी : परतर फेब्रुवारी रोजी पैशाच्या देवाण घेव-ाणच्या वादातून गावठी कट्टह्यातून गोळीबार करून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नातील अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीवरून व पुन्हा गोपनीय माहिती मिळवून गावठी कट्टा पुरविणाऱ्याला मध्य प्रदे-शातून पोलिसांनी अटक केली आहे. दोन फेब्रुवारीला भर दुपारी लोणी येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कृष्णा अर्जुन खरात व भगवान तसनुसेसह एका अल्पवयीन आरोपीला आष्टी पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. यापैकी अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात तर कृष्णा खरात आणि भगवान तसनुसे यांना पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती. कस्टडीत असताना गावठी कट्टा कोठून आणला याचा तपास पोलिसांनी केला असता मध्यप्रदेश कनेक्शन उघड झाल्याने आष्टी पोलिस ठाणे एलसीबीचे एक पथक मध्यप्रदेशात पाठवण्यात आले होते. या पथकाने देवीदास भाईदास बरेला (ह.मु. रांजणगाव, ता. वली, जि. बडवणी मध्यप्रदेश) याला तेथून ताब्यात घेतले आहे. आरोपीला परतूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदरील कारवाई उपनिरीक्षक प्रदीप डोल्हारे, एलसीबीचेचे फुलसिंग गव्हाणे, कैलास चेके, आष्टी पोलिस ठाण्याचे गणेश शिंदे बन्सी पानजंजाळ आर्दीच्या पथकाने केली आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!