प्रजासत्ताक दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

स्नेहबंध मैत्री फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी/आष्टी:- परतूर तालुक्यातील आष्टी येथील स्नेहबंध मैत्री फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आष्टी व परिसरातील विविध शाळेत होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी शालेय विद्यार्थी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त होतात. परंतु वह्या,पेन , पेन्सिल, कंपास, दफ्तर, वाॅटर बॅग इ. साहित्य पालकांना विकत घ्यावे लागते. यात अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते यातून होतकरु, गरीब विद्यार्थी शैक्षणिक प्रगती पासून वंचित राहू नये .हिच गरज लक्षात घेऊन स्नेहबंध मैत्री फाउंडेशन कडून दरवर्षी आष्टी व परिसरातील विविध शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी फाउंडेशनचे
पांडुरंग उनवणे ,श्रीकांत महेत्रे ,ऋषिकेश क्षीरसागर ,विजय कडपे ,दिपक भालशंकर ,सचिन राऊत ,चेतन सोनी ,अमोल जोशी ,सिद्धेश्वर सोळंके ,विकास टेकाळे ,शरद मोरे ,ज्ञानेश्वर बच्चेवार ,निमा सातपुते ,अंजली महाजन,विष्णु केकान ,मनोज हलगे आदींची उपस्थिती होती.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल