आष्टी येथे लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार;

परतूर प्रतिनिधी : पी डी सोळंके <br>आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने मंगळवार(ता.8) पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजेश नवल हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून के.बी.जगताप, वसंत धोंगडे, पी. डी. घुगे यांची उपस्थिती होती.

यावेळी विष्णू सोळंके,ऊध्दव डोळस,माऊली सोळंके,मुजिब जमिनदार यांनी मनोगत व्यक्त केले.प्रारंभी प्रास्ताविक मोहन सोळंके यांनी केले. सुत्रसंचालन कैलास शेळके, आभार प्रदर्शन प्रा.समाधान खरात यांनी केले.

यावेळी पी. डी. घुगे,सिध्दार्थ कुलकर्णी, प्रा.बिरादार,प्रा.काकडे, प्रा. विजय वायाळ,प्रा.गौकुळ कदम,प्रा.योगीराज सोळंके,बद्री कदम,वसंत गायकवाड,राहुल सवादे,डी.डी.पवार,यांच्या सह शिक्षक व पत्रकार उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल