पंचशील ध्वज दिन ८ जानेवारी

बौद्ध ध्वजाचे जनक आणि पहिले अमेरिकन बौद्ध सेवानिवृत्त कर्नल हेन्री स्टील ऑल्कोट होते. सद्याच्या बौद्ध धम्म  ध्वज किंवा पंचशील ध्वजाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. श्रीलंकेत त्यांनी बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केले. त्यामुळे हेन्री स्टील ऑल्कोट हे श्रीलंकेतील धार्मिक, राष्ट्रीय पुनरुज्जीवनासाठी आजही नायक म्हणून ओळखले जातात.
श्रीलंकेतील कोलंबो समितीने 1885 मध्ये धम्म ध्वजाची रचना केली होती. हिक्काडुवे सुमंगला थेरा (अध्यक्ष), मिगेट्टुवाट्टे गुणानंद थेरा, डॉन कॅरोलिस हेवेविथराना, आंद्रिस परेरा धर्मगुनावर्धना, चार्ल्स ए डी सिल्वा, पीटर डी अब्रेव्ह, विल्यम डी अब्रेव्ह, एच. विल्यम फर्नांडो, एन.एस. फर्नांडो आणि कॅरोलिस पुजिथा गुणवर्धन (सचिव) सारखे लोक या समितीमध्ये होते.
बौद्ध धम्म ध्वज पहिल्यांदा 28 मे 1885 रोजी वैशाख पौर्णिमेच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सार्वजनिकरित्या फडकवण्यात आला. 1952 मध्ये बौद्ध ग्लोबल कौन्सिलमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून या ध्वजाला मान्यता देण्यात आली. दर वर्षी 8 जानेवारी हा दिवस धम्म ध्वज, पंचशील ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो.
या ध्वजामध्ये क्रमाने निळा, पिवळा, लाल, पांढरा आणि केशरी अश्या रंगांचा समावेश होतो. काही देशांमध्ये केशरी रंगाच्या ठिकाणी गुलाबी आदी रंगाचा उपयोग केला जातो. यातील रंगांची विशेषता खालील प्रमाणे :
धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण जगात बौद्ध धम्माचे एकच प्रतीक असले पाहिजे, या विचारातून श्रीलंकेत बौद्ध ध्वजाची निर्मिती करण्यात आली. जागतिक बौद्ध ध्वज प्रथम 1885 मध्ये श्रीलंकेत फडकवण्यात आला. बौद्ध ध्वज बौद्ध धम्माचे प्रतिनिधित्व करतो आणि हा ध्वज जगभरात विश्वास आणि शांतीचे ते प्रतीक आहे.
बौद्ध ध्वजाचे जनक आणि पहिले अमेरिकन बौद्ध सेवानिवृत्त कर्नल हेन्री स्टील ऑल्कोट होते. सद्याच्या बौद्ध धम्म ध्वज किंवा पंचशील ध्वजाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. श्रीलंकेत त्यांनी बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केले. त्यामुळे हेन्री स्टील ऑल्कोट हे श्रीलंकेतील धार्मिक, राष्ट्रीय पुनरुज्जीवनासाठी आजही नायक म्हणून ओळखले जातात.
श्रीलंकेतील कोलंबो समितीने 1885 मध्ये धम्म ध्वजाची रचना केली होती. हिक्काडुवे सुमंगला थेरा (अध्यक्ष), मिगेट्टुवाट्टे गुणानंद थेरा, डॉन कॅरोलिस हेवेविथराना, आंद्रिस परेरा धर्मगुनावर्धना, चार्ल्स ए डी सिल्वा, पीटर डी अब्रेव्ह, विल्यम डी अब्रेव्ह, एच. विल्यम फर्नांडो, एन.एस. फर्नांडो आणि कॅरोलिस पुजिथा गुणवर्धन (सचिव) सारखे लोक या समितीमध्ये होते.
बौद्ध धम्म ध्वज पहिल्यांदा 28 मे 1885 रोजी वैशाख पौर्णिमेच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सार्वजनिकरित्या फडकवण्यात आला. 1952 मध्ये बौद्ध ग्लोबल कौन्सिलमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून या ध्वजाला मान्यता देण्यात आली. दर वर्षी 8 जानेवारी हा दिवस धम्म ध्वज, पंचशील ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो.
या ध्वजामध्ये क्रमाने निळा, पिवळा, लाल, पांढरा आणि केशरी अश्या रंगांचा समावेश होतो. काही देशांमध्ये केशरी रंगाच्या ठिकाणी गुलाबी आदी रंगाचा उपयोग केला जातो. यातील रंगांची विशेषता खालील प्रमाणे :
निळा :
हा रंग समानता, विशालता, दूरदृष्टी आणि अनंताचे प्रतीक मानला जातो.
पिवळा :
हा रंग समृद्धीचे, करुणा आणि चारित्र्य संपन्न जीवनाचे प्रतीक मानला जातो.
लाल :
हा रंग अग्नीचे प्रतीक मानला जातो, दृढनिश्चय आणि गतिशीलता दर्शवितो.
पांढर :
हा रंग शांती आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो.
केशरी :
हा रंग त्याग आणि सेवा यांचे प्रतीक मानला जातो.
पंचशील धम्म ध्वज हा बुद्धांची शिकवण व त्यांचे जीवन यांचे प्रतिक आहे. तो समस्त विश्वाला शांतीप्रिय प्रगतीशील जीवनाचा संदेश देत असतो.
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल