शिवरायांच्या काळात जातीयतेला थारा नव्हती; समाजात जे चालले ते वाईटच किर्तनात हभप माऊली महाराज पठाडे यांचे प्रतिपादन

स्वराज्य वार्ता / राम राठोड

प्रतिनिधी आष्टी :- छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श लोककल्याणकारी राजे होते.त्याच्या स्वराज्यामध्ये कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला जात धर्माच्या नावाने ओळख केली जात नव्हती.त्याच्या काळात जातीवाद व जातीयवाद्यांना थारा नव्हती मात्र आज जे काही समाजात चालू आहे ते वाईटच असल्याची खंत हभप माऊली महाराज पठाडे यांनी समाज प्रबोधनपर परतूर तालुक्यातील आष्टी येथील ग्रामदैवत खंडोबा मंदिर येथे भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह सोहळ्यात रविवारी (०१) रात्री तीसऱ्या दिवशीच्या कीर्तनसेवेत बोलत होते.

पुढे बोलतांना महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वारंवार सांगायचे कारण म्हणजे आपण त्याचा इतिहासापासून प्रेरणा घेतली पाहिजे त्या काळामध्ये जो विचार आमच्या समाजाला दिला तो विचार काही तरी आपल्या अंतःकरणामध्ये,आचारणामध्ये आणले पाहिजे .आज जे काही समाजात चालू आहे ते वाईटच आहे.देशात शिवरायांच्या नावाखाली राजकारण केले जात आहे.मात्र शिवरायांनी जातीयतेला थारा दिला नाही.अठरापकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली.

परतु आज राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजा-समाजात तेढ निर्माण केला जात आहे.धर्माधर्मात जातील दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केले जात आहे ही शोकांतिका असून आपण शिवरायांच्या मात भुमीत जन्म घेतला आहे.यासाठी आपण शिवरायांचे विचार अमलात आणून जीवन जगले पाहिजे असा सल्ला देखील महाराजांनी दिला.दरम्यान महाराजांनी प्रत्येक महिलेला माते सन्मान मानून सन्मान केला.यासाठी प्रत्येकाने समाजातील आई बहिणींचा सन्मान केला पाहिजे.यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल