किरण पाटील मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी एस.ए.भोईसर,शरद महाजन, भाऊराव महाजन, वसंतराव दुट्टे, नामदेव भिल्ल,नथ्थू तायडे, यशवंत चौधरी, अनिल वाडीले, शेख भैय्या शेख करीम ,ग्रंथपाल मधुकर वानखेडे, अनिल न्हावकर, निखिल शिरतुरे,वाचक व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिराजी यांचे जिवनपटावर वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए.भोईसर यांनी माहिती दिली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!