प्रथम पारोतिषोक अनिता शेळके , दुतीय, वैष्णवी कानगुडे, तृतीय वंदना विठ्ठल राजे ,चौथे रुक्मिणी आढाव यांणी पटकावले
परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे.
परतुर शहरात प्रथमच महिला साठी न्यू होमीनस्टर खेळ रंगला पैठनीचा या कार्यक्रमाचे आयोजन मा, नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांणी वरद विनायक मंगल कार्यलयात आयोजित केला होता .या कार्यक्रमाला महिलांनी भरभरूण प्रतिसाद देत कार्यक्रमाचा भरघोस आंनद लुटला कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या विजेत्या सह प्रत्येक महिलाना मा, नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांनी तिन छोटेखनी भेट वस्तु देऊण सत्कार केला. क्रांती नाना माळे गावकर प्रस्तुत न्यु होमिस्टर खेळ पैठनीचा कार्यक्रमाचे प्रथम पारितोषिक अनिता शेळके यांणी पटकाविले तर दुतीय पारीतोषिक वैष्णवी कानगुडे , तृतीय पारीतोषीक वंदना राजे तर चौथे पारीतोषीक रुक्मिणी आढाव यांणी पटकावले. या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या संयोजिका श्रीमती. प्रज्ञाताई वाघमारे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मार्गदर्शक शिबिर आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रज्ञाताई वाघमारे यांनी उपस्थित महिलांना व काँग्रेस पक्ष वाढण्याच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नितीन जेथलिया, तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजीत घनवट, किसनराव मोरे ,आशिष जेथलिया ,बाळासाहेब अंभिरे,परतूरचे युवक तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव शिंदे, अण्णासाहेब खंदारे ,माऊली वायाळ ,माऊली तनपुरे ,सुरेश सवणे सिद्धू पाटील सोळंके ,मंजुळदास सोळंके, वैजनाथ बागल, पंजाब देशमुख ,शाकीर भाई मापेगावकर ,विठ्ठलराव खरात, आनंदा भारसाकळे, प्रफुल आबा शिंदे ,सारिका ताई वरणकर, सर्व नगरसेवक नप आदींची उपस्थिती होती. मा.नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांनी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचे सर्व महिलांनी आभार मानले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!