कोरोना काळात केलेल्या मदतीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये श्रेय घेण्याचे राजकारण जोरात सुरु

विधानसभा निवडणुका तोंडावर कोरोना काळातील फोटो करताय नेते सोशल मीडियावर व्हायरल

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर प्रतिनिधी : राजकीय पोळी भाजुण घेण्या करिता कोराणा काळात मदत केल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट टाकुण खालच्या स्तरावर राजकरण करायला लागले. कोराणा सारख्या माहामारी मधील लॉकडाऊण ची आठवण आजही आठवली तर प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडतो अनेक जणाना या महामारी मध्ये जिव गमवावा लागला तर अनेक नागरिकांना हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागला. काही नागरीकांना जेवणा वाचुण पाण्या वाचुण आपला जिव गमवावा लागला होता, हे सत्य असुण कोराणा माहारीच्या काळात अनेक सामाजिक कार्यकर्ता, राजकीय नेते अन्न दात्यानी पुढे येऊण सढळ हाताने मदत केल्याने अनेकांचे प्राण वाचवले पंरतु त्यांणी हे काम मानव धर्म म्हणुन केले पंरतु दुर्दैव म्हणावे लागेल. परतुर मंठा विधानसभा मतदार संघातील जनतेचे कारण ईथल्या राजकारनी यांनी आता कोराणा काळात केलेल्या थोडीयफार मदतीच्या जोरावर आपली राजकीय पोळी भाजुण घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहे. कोराणा काळात केलेल्या मदतीचे एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला माहिती पडायला नाही पाहिजे. विधानसभा तोंडावर आल्यानंतरच अशा पद्धतीचे विषय का घेतले जातात या पाठीमागे काही स्वार्थ तर नाही ना अशी गाव कट्ट्यावरील भागामध्ये तर सध्या जोरदार चर्चा चालू आहे. जुन्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखा हा प्रकार आहे. कोरोना काळामध्ये अत्यंत भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना कोरोना काळामध्ये ज्याची आई गेली ,ज्याचा बाप गेला ,ज्याचा मुलगा गेला , त्याचे दुःख आणि वेदना ज्या परिवाराला झाल्या आहेत ते हे न विसरू शकणारे संकट आहे. आणि आपण या कोरोना काळात केलेल्या मदतीवरती सोशल मीडिया वरती बिनधास्तपणे आपण एक राजकीय लालसापोटी पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहात. पण मात्र येथील जनता जी आहे तर ती एवढी दूधखुळी नाहीये. हे फोटो फेसबुक, वॉटसाप ,इंस्टाग्राम या सोशल मीडिया वर टाकुण राजकीय पोळी भाजुण घेण्या करिता राजकीय नेत्याच्या सोशल मीडिया टिम मध्ये चढाओढ लागली आहे. सामान्य नागरिकाच्या मनाला मोठा मनस्ताप होत असून सहानुभूती ऐवजी राजकारण्याविषयी चीड निर्माण होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल