उज्जैनकर फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त 51 मान्यवरांना तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार तर तालुकास्तरीय 66 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न

स्वराज्य वार्ता / किरण पाटील

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे नुकताच तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य, मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श समाज सेवक व आदर्श पत्रकार तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला .सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा फाउंडेशनचे राज्य सचिव छत्रपती संभाजी नगर येथील प्रा. डॉ. सुभाष बागल यांच्या अध्यक्षतेखाली व भारताची पहिली महिला सर्पमित्र राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हिवरा आश्रम येथील वनिताताई बोराडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले तर या कार्यक्रमाचे विशेष अतिथी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी महिला प्रदेशअध्यक्ष अँड रोहिणीताई खडसे खेवलकर या होत्या .याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष डॉ. जगदीशदादा पाटील, डॉ.प्रवीण पाचपांडे, मुक्ताईनगर तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश पाटील, माजी सभापती निवृत्तीभाऊ पाटील, विनोदभाऊ सोनवणे, खामगाव येथील विनोदभाऊ डीडवानिया तसेच फाउंडेशनच्या विविध जिल्ह्यातील पदाधिका ऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या 66 विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला .याप्रसंगी मान्यवरांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले व विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत करणे होय असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.

दुपारी भोजनानंतरच्या सत्रामध्ये विविध जिल्ह्यातील 51 आदर्श प्राचार्य, मुख्याध्यपक, आदर्श समाजसेवक ,आदर्श पत्रकार, आदींना तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले .या सोहळ्याचे अध्यक्ष फाउंडेशनचे राज्य सल्लागार अकोला येथील तुळशीराम बोबडे हे होते तर या सोहळ्याचे उद्घाटक फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन खामगाव येथे संपन्न झाले या संमेलनाचे कार्याध्यक्ष खामगाव येथील उद्योजक विनोदभाऊ डिडवानिया यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले याप्रसंगी व्यासपीठावर फाउंडेशनचे राज्य प्रसिद्धीप्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत, राज्य सचिव अकोला येथील डॉ. अशोक शिरसाठ ,राज्य खजिनदार साखरखेर्डा येथील कवी रामदास कोरडे ,फाउंडेशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष हिवरा आश्रम येथील डॉ.पंढरीनाथ शेळके, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख खामगाव येथील पांडुरंग दैवज्ञ, बुलढाणा जिल्हा समन्वयक खामगाव येथील बाळूभाऊ ईटणारे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शंकरराव अनासुने , भगवान पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नाशिक येथील प्रा. संदीप गोसावी, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष जळगाव येथील श्रीमती ज्योतीताई राणे ,उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव गणेश कोळी, जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर पाटील ,जळगाव जि. उपाध्यक्ष श्री मधुकर पोतदार, मराठवाडा विभागीय प्रसिद्धीप्रमुख धाराशिव येथील डॉ.मधुकर हुजरे ,छ. संभाजी नगर जिल्हा संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे, धाराशिव जिल्हा विधी सल्लागार अँड कुलकर्णी, धाराशिव जिल्हा समन्वयक सौ. सरोज कुलकर्णी तसेच उज्जैनकर फाउंडेशनचे कार्यकारी सचिव प्रमोद पिवटे, खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर ,सौ.दिपाली दीपक सोनी ,आशिष उंबरकर तसेच फाउंडेशनचे आजीव सभासद व विविध जिल्ह्याचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, पत्रकार, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या प्रसंगी भारताची पहिली महिला सर्पमित्र वनिताताई बोराडे यांनी विविध सर्प दाखवून त्यांची उपस्थितांना माहिती दिली पर्यावरणाविषयी माहिती दिली याप्रसंगी अनेक मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी सापाला स्पर्श करून आनंद व्यक्त केला .याप्रसंगी एन.जी. शेजोळे साहेब ,शरद बोदडे आदींनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे वडील मधुकरराव उज्जैनकर व आई सौ.अनुसया बाई उज्जैनकर यांना मानपत्र शॉल व गुलाब बुके देऊन त्यांचा आदर्श माता पिता म्हणुन देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संत शिरोमणी नरहरी महाराज ट्रस्ट मुक्ताईनगर तालुक्याचे अध्यक्ष प्रवीण शुरपाटणे यांनी समाजाच्या वतीने डॉ.शिवचरण उज्जैनकर व सौ. संगीताताई उज्जैनकर यांचा शाल व गुलाब बुके देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हा विधी सल्लागार अँड कुलकर्णी व धाराशिव जिल्हा समन्वयक सौ. सरोज कुलकर्णी यांनी सुद्धा डॉ. उज्जैनकर व सौ. संगीता उज्जैनकर यांचा शाल, गुलाब बुके व श्रीकृष्णाचा फोटो फ्रेम भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित दोघेही सत्रातील कार्यक्रमाचे मान्यवरांनी भाषण केलीत यावेळी उज्जैनकर फाउंडेशनच्या 15 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्याचे खूप खूप कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व कार्यकारी सदस्य प्रा. विनायक वाडेकर यांनी केले तर दोघेही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष श्रीमती ज्योतीताई राणे यांनी केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल