राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्या वर गुन्हा दाखल करा परतुर काँग्रेसच्या वतीने पोलिसांना निवेदन

शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड त्यांच्यावर कडक कार्यवाही करुन गुन्हा दाखल करा

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर प्रतिनिधी : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सेनेचा बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्यावर कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस डॉ. सिद्धार्थजी हत्तीअंबीरे यांच्या आदेशावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या बद्दल शिंदे सेनेचा बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड याने बेताल वक्तव्य केले असून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जनतेचे सेवक हेच जर हुकुमशहा सारखे वागत असतील व देशातील कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचे काम करत असतील तर सामान्य माणसाचे काय अशा गद्दार महाराष्ट्र द्रोही शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड याने राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्यावर कडक कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी परतुर काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावरील सह्या नितीन जेथलिया युवा नेते काँग्रेस, बाबासाहेब घाडगे तालुका अध्यक्ष परतुर, गौतम गंगाराम वाघमारे तालुका अध्यक्ष अ.जा.वि काँग्रेस, इंद्रजीत घनवट, अविनाश शहाणे, बाबुराव हिवाळे, प्रल्हाद वाहुळे, सिद्धार्थ बंड, काँग्रेस शहराध्यक्ष, गुलाब बंड ,सनी गायकवाड शेख नय्युम, लक्ष्मण खोत, लक्ष्मण शिंदे युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष, दत्ताराम अंभोरे, गणेश ढवळे ,अंकुश आढे, इत्यादी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल