वैजोडा गावात एक विकास काम दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा. -वैजनाथ विठ्ठल यादव

उपविभागीय अधिकारी कार्यालय परतुर येथे वैजोडा ग्रामस्थ बसले उपोषणाला

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 

परतूर तालुक्यातील वैजोडा येथील

ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत. मौजे वैजोडा येथे ग्रामपंचायत अंतर्गत केवळ बोगस कागदोपत्री कामे दाखवून लाखोंची बिले उचलली आहेत. मातोश्री पांदन रस्ता, पाणीपुरवठा टाकी , धनगर वस्ती मधील रस्ता, मातोश्री पांदन रस्त्याचे कोणतेही काम न करता गैर कायदेशीररित्या सरपंच व संबंधित अभियंता , पंचायत समिती परतुर गटविकास अधिकारी,यांनी संगणमत करून बिल उचलल्याने सदर कामाची पाहणी व पंचनामा करून सरपंचावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. 

अनेक वेळा ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती परतुर ,व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जालना व वरिष्ठ कार्यालयांना तक्रारी अर्ज देऊन ही अद्याप पर्यंत कुठलीही कामाची चौकशी व कामाची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली नाही.

तसेच रस्त्याचे मस्टर पेमेंट कोणत्याही प्रकारचे काम न करता उचललेले आहे .सरपंच या पदाचा गैरफायदा घेऊन संबंधित गावात कोणतेही काम न करता पेमेंट उचललेले आहे .गावात कोणत्याही प्रकारचे विकासकाम न करता पैसे उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

त्यामुळे नाईलास्तव लोकशाही मार्गाने रास्त मागण्या करीता मा.उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 16/9/2024 पासून आमरण उपोषण आम्ही करत आहोत .त्याच्या सर्वस्वी परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी.

असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदना वरील सह्या योगेश शिंदे,, रोहिनाना वैद्य, प्रताप वैद्य परमेश्वर जाधव ,गणेश गायवळ, लक्ष्मण गायवळ ,नरसिंह कवडे, अशोक कवडे, विष्णू रोडगे ,प्रकाश भदर्गे, गजानन यादव ,भाऊसाहेब खामकर, दत्ता गायवळ, नामदेव गायवळ ,विठ्ठल जाधव, दीपक वैद्य ,सुनील गुजर, शुभम वैद्य, सुभाष मैद,आसाराम मैद,शिवाजी निकम, मुकेश यादव, प्रभाकर मस्के ,प्रकाश कवडे, दिगंबर जाधव ,रामदास खेडकर ,लक्ष्मण शिंदे ,अतुल शिंदे, शिवाजी गायवळ, गजानन गायवळ, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल