भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी भाजपाचा शेला देऊन केला प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार

सेवली येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश

स्वराज्य वार्ता / अशोक साबळे

परतूर प्रतिनिधी : सर्वसामान्य कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा प्राण असून आज सेवली येथील कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत याचा आनंदा असून कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाने आज, अगदी लोकसभेच्या दोन जागा वरून सुरुवात करत देशातील सर्वात मोठा पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेत आला असून, प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांनी गेल्या दोन पंचवार्षिक योजनेमध्ये केलेला भारताचा विकासात्मक कामावर, महाराष्ट्र राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पक्षाने झेप घेतलेली असून, यामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचे भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी सांगितले. ते परतुर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या कार्यालयावर संपन्न झालेल्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की माझे मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सातत्याने परतुर विधानसभा मतदारसंघाचा मोठा विकास केला असून तीनशे गावात डांबरीकरणाचे रस्ते अनेक गावांमध्ये सभा मंडपे गावाला जोडणारी जोड रस्ते वीज वितरण कंपनीचे विणलेले विजेचे जाळे या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाचे असून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या विकासाच्या माध्यमातून प्रगती झाली असल्याचे सांगितले. यावेळी शेवली येथील कैलास पवार अशोक सदावर्ते निखिल रेंगे आत्माराम सपकाळ रामेश्वर शिंदे किशोर तुपकर साहेबराव शिंदे अविनाश घुले संदीप सदावर्ते संतोष सापले सुरेश शीलवंत विठ्ठल सपकाळ सोनाजी खंदारे, सुरेश पवार कैलास पवार संतोष पवार संदीप पवार दत्ता महाशब्द, संजय पवार कृष्णा तीवरे आदींनी पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संपत टकले, समाधान वाघमारे, गणेश जावळे, सरफराज कायमखानी, नरेश कांबळे, निवृत्ती गोरे, विकास बोडके यांची उपस्थिती होती. शेवलीचे युवा कार्यकर्ते समाधान वाघमारे यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा पार पडला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल