वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घुसले भामटे बोगस राजपुत !

चौकशी करा अन्यथा बंजारा ब्रिगेड रस्त्यावर उतरणार- अर्जुन नायक

स्वराज्य वार्ता / राम राठोड

परतूर प्रतिनिधी : जालना शासनाच्या वतीने 2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती, यामध्ये विमुक्त जाती प्रवर्गात 312 भामटा राजपुतांनी घुसखोरी केल्यामुळे व या प्रक्रियेत सवर्ण आणि बिगर मागास असणार्‍या लोकांनी घुसखोरी केल्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत त्यांना यापासुन वंचित रहावे लागले असुन या संदर्भात चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा बंजारा ब्रिग्रेड रस्त्यावर उतरून त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार असा इशारा बंजारा ब्रिगेड प्रदेश सचिव तथा बंजारा समाजाचे धडाडीचे नेतृत्व अर्जुन रामराव नायक यांनी आज जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनातुन दिला आहे. याबाबत अधिक असे की, एमबीबीएस/बिडीएस/बीएएमएस/बीयुएमएस पी.टी या वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 2024 मध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द झाली असुन या यादीमध्ये एकुण 312 बोगस भामटा राजपुत च्या विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे स्पष्ट जाणवत आहे, या बोेेेेेेेेेगसमुळे विमुक्त भटक्या जमातीवर अन्याय झशला असुन सवर्ण व बिगर मागास असणार्‍या लोकांनी या प्रवर्गात घुसखोरी केली आहे, आणि जे खरे लाभार्थ्यी विमुकक्त जाती प्रवर्गातील उमेदवारांना मेडीकलमध्ये अ‍ॅडमिशन मिळणे अशक्य झाले आहे, पैशाचा माज दाखवुन या बोगस लागार्थ्यांनी जातवैधता प्रमाणपत्रे मिळवून आपला प्रवेश निश्‍चित केल्यामुळे गुणवत्ता असुन देखील खरे लाभार्थी केवळ आर्थिक कमजोरीमुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच परंतु त्यांची इच्छाशक्ती देखील कमजोर होण्यास केवळ प्रशासनच जबाबदार असुन याची चौकशी करून संबंधीतांवर तात्काळ करावी अन्यथा बंजारा ब्रिगेड रस्त्यावर उतरून संबंधीतांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही, आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असाही इशारा बंजारा ब्रिगेड प्रदेश सचिव तथा बंजारा समाजाचे धडाडीचे नेतृत्व अर्जुन रामराव नायक यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनातुन दिला आहे. या निवेदनावर अ‍ॅड.एन.एन.आढे, अ‍ॅड.एम.पी.पवार, अमीत रामराव राठोड, विजय बाबुराव राठोड, शाम अर्जुन राठोड, सुनिल छबुराव राठोड, सचिन गणेश राठोड यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल