मंदिरातील दानपेटी फोडून बारा हजार रुपये लंपास

दोन अल्पवयीन चोरटे चोवीस तासाच्या आता पोलिसांनी केले जेरबंद

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर प्रतिनिधी : शहरातील राजे संभाजी नगर वसाहतीत ओंकारेश्वर महादेवाचे मंदिर नवीनच उभारण्यात आलेले आहे. अगदी मोकळ्या असलेल्या परिसरात हे मंदिर असून मंदिराच्या दोन्ही बाजूला घरे व इतर दोन्ही बाजूला मोकळी जागा आहे. अशा गजबजलेल्या परिसरातील या ओंकारेश्वर मंदिरात याआधी चोरट्यांनी दोनदा दान पेटी फोडून पैसे लंपास केलेले होते. असाच प्रकार दि. ३ रोजी घडला याबाबत पोलिस चौकी मोंढा येथे तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, काल दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास राजे संभाजी नगर कॉलनीतील उत्तम अंबादास बिराडे हे नेहमी प्रमाणे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यांना मंदिरातील दानपेटी उघडी दिसली. त्यांनी जवळ जाऊन पहिले असता त्यांना दानपेटी फुटलेली दिसली व त्यांनी तात्काळ कॉलनी मधील विष्णू शामराव ढवळे, शिवाजी जनार्धन पोकळे, परमेश्वर बिडवे, उद्धव चव्हाण, अरुणराव ढवळे, गजानन म्हस्के, यांना कॉल करुन बोलावले व दानपेटी उघडी असल्याबाबत माहिती दिली. ताबडतोब सर्व जण मंदिरात आले व दानपेटी फुटली असे सर्वांच्या लक्षात आले. श्रावण महिना असल्याने या दानपेटी मध्ये किमान बारा ते तेरा हजार रुपये जमा झाले असतील असा ठाम अंदाज व्यक्त करुन सर्वांनी पोलिस तक्रार दिली. यावरून उपविभागीय पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे तसेच पोलिस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासानिक अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक लिंबाजी गाढवे यांनी तपास चक्र फिरवले व मंदिरातील सिसिटीव्ही तपासले असता त्यांना महा. २१ बिएल १७३५ नंबर च्या मोटारसायकल वरून दोन अज्ञात मुलं येताना, मंदिराच्या पायऱ्यावर बसलेले तसेच जाताना हे चोरटे कैद झाल्याचे दिसले. यापुढे त्यांनी सदरील नंबर च्या गाडी चा शोध घेऊन चोवीस तासाच्या आता चोरटे जेरबंद केले. सदरील दोघे ही अल्पवयीन असून दोघांची या व इतर प्रकरणा बाबत चौकशी सुरु असल्याचे पोहेकॉं अशोक गाढवे यांनी सांगितले. या तपासकामी पोहेकॉं एस. आर. गायकवाड व डि. डब्ल्यू. गोपनवाड यांचे सहकार्य लाभले.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल