मंठा तालुक्यातील ढगफुटी सदृश परिस्थितीचा माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा; तलाठी ग्रामसेवकांसह गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याची दिले आदेश

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करत मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे दिले निर्देश

या नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी रात्री बे रात्री कधीही फोन करा मी निश्चितपणे प्रयत्न करीन – आमदार लोणीकर

खांदे मळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावले; आमदार लोणीकर लोणीकरांच्या सूचनेनंतर तात्काळ बचाव पथक पाटोदा गावात दाखल

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी:- अशोक साबळे

मंठा तालुक्यात दुपारी एक वाजेपासून ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून गावातील नागरिकांचा काही ठिकाणी संपर्क तुटला आहे काही ठिकाणी नागरिक अडकून पडले असून अडकलेल्या नागरिकांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना संपर्क करून मदत करण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत गाव पातळीवर कुठल्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदारांशी बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की पांगरी खुर्द पाटोदा लिंबेवडगाव वाडेगाव पांढुर्णा आरडा तोलाजी ढोकसाळ सावरगाव वायाळ नायगाव यासह ज्या गावांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे नागरिक अडकून पडले असतील अशा सर्व ठिकाणी बचाव पथकांना पाठवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे त्यासाठी एसआरपीएफ किंवा एनडीआरएफ टीम ची मदत घ्यावयाची झाल्यास तात्काळ त्या संदर्भात कळवावे अशी सूचना केली. गावात पाणी शिरल्यामुळे किंवा नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांच्या इमारती तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, शासकीय निवासस्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वस्तीगृह, मॉडेल इंग्लिश स्कूल ची इमारत, शासकीय विश्रामगृह, आयटीआय कॉलेज यासह सर्व मंगल कार्यालय तात्काळ ताब्यात घेऊन या नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना देखील यावेळी लोणीकरांनी केली. “रात्री बेरात्री कितीही वाजले तरी मी तुमच्या मदतीसाठी कोणत्याही क्षणी तयार आहे, काहीही अडचण असली तरी मला फोन द्वारे कळवा तुम्हाला तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करीन” अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. पोळ्यानिमित्त खांदे मिळून करण्यासाठी पाटोदा गावातील काही शेतकरी बांधव आपल्या शेतात बैलांची पूजा करण्यासाठी गेले असता अचानक पडलेल्या पावसामुळे व नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे मंठा तालुक्यातील पाटोदा येथील काही शेतकरी शेतात अडकल्याची बातमी लोणीकरांना फोनवरून कळल्यानंतर त्यांनी तात्काळ बचाव पथकांना कळवून त्या शेतकऱ्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सूचना केली लोणीकरांच्या सूचनेमुळे तात्काळ पथक पाटोद्याकडे रवाना झाले असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार काळदाते यांनी दिली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल