आयुष्य माझं तूच…….

आयुष्य माझं तूच…….

 

समजवताना स्वताःला

तू ही कधी थकली असशील..

विसरण्याच्या प्रयत्नात

मलाच सतत आठवत असशील..

माझ्या सुखासाठी स्वताःशीच

कधी रुसली असशील..

तू ही कधी नकळत

माझ्या प्रेमात पडली असशील..

आठवणीत माझ्या रमताना

एखादी रात्र जागली असशील..

पाहून मला येताना

तू ही थोडी सुखावली असशील..

धडधडणाऱ्या हृदयाशी

एकांतात भांडली असशील..

तू ही कधी नकळत

माझ्या प्रेमात पडला असशील..

दुरावताना हात हातातील

तू ही थोडी दुखावली असशील..

अश्रू माझे पाहून

तू ही मनात गहीवरली असशील..

“आयुष्य माझं तूच” म्हणताना

थोडसं तरी रडली असशील..

तू ही कधी नकळत

माझ्या प्रेमात पडला असशील…!!

 

कवी :- अमन प्रधान

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल