उज्जैनकर फाउंडेशन तर्फे प्राचार्य आर. पी. पाटील यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार

स्वराज्य वार्ता / किरण

जळगाव : जे.ई.स्कूल व जुनिअर कॉलेज मुक्ताईनगर येथील कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री आर. पी. पाटील सर हे नुकतेच 31 ऑगस्ट 2024 रोजी सेवानिवृत्त झाले ते 1996 मध्ये निमखेडी या ठिकाणी नवीन माध्यमिक विद्यालयांमध्ये विनाअनुदानित शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले तेव्हापासून सलग मुख्याध्यापक पदावर पाटील सर विराजमान होते त्यानंतर त्यांची जे. ई. स्कूल व जुनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे प्राचार्य पदी नेमणूक झाली तालुक्यातील सर्वात जुनी व सर्वात मोठी अशी ही नामवंत जे.ई.स्कूल व कॉलेज येथे त्यांच्या कार्य काळामध्ये अनेक मान सन्मान त्यांनी या विद्यालयाला प्राप्त करून दिलेत विविध प्रकारचे उपक्रम सुद्धा त्यांनी सहज व कौशल्याने हाताळले व शिक्षक विद्यार्थी यांना वेळोवेळी त्यांचे प्रेरणादायी असे मार्गदर्शन लाभले त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मुक्ताई मंदिरा जवळील भव्य सभागृहात संस्थेच्या चेअरमन एडवोकेट सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर त्याचप्रमाणे संस्थेचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री एकनाथराव खडसे संस्थेचे सचिव डॉ. सी. एच. चौधरी त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू, भगिनी व प्राचार्य पाटील यांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी प्राचार्य श्री आर. पी. पाटील सर यांचा सपत्नीक सत्कार केला प्रसंगी नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी सुद्धा प्राचार्य श्री आर. पी. पाटील सर यांचा शाल व गुलाब बुके देऊन सपत्निक सत्कार केला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल