चोऱ्या, घरफोड्या करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात;

आष्टी ठाणे हद्दीतील ५ तर सेलु येथील १ गुन्हा उघड;

स्वराज्य वार्ता / राम राठोड

आष्टी/प्रतिनिधी : परतुर तालुक्यातील आष्टी पोलिसांनी चोऱ्या-घरफोड्या करणाऱ्या दोघांना गुरुवारी दिनांक २९ रोजी अटक केले असून, त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आष्टी ठाणे हद्दीतील ५ तर सेलु येथील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ईंगेवाड यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आष्टी पोलिसांनी कबीर बुढन पठाण वय ३२ आणि सलमान मोईन शेख वय २२, दोघे रा. आष्टी यांना संशयीत म्हणुन अटक केली असून, त्यांच्याकडून आष्टी येथील २ घरफोड्या, शेतातील ३ मोटार चोरीचा तर सेलु येथील दुचाकी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच गुन्ह्यातील दुचाकीसह विद्युत मोटार आणि इन्र्व्हटर, बॅटरी, वायर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गत काही दिवसांपासुन आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्या, घरफोडीचे प्रमाण वाढले होते.

त्यानुसार गस्त वाढविण्यात आली असून, त्यात हे दोघे जेरबंद करण्यात आले असल्याचे श्री. ईंगेवाड यांनी सांगितले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, फौजदार अजित चाटे, गोपीनाथ कांदे, सहाय्यक फौजदार श्री. जाधव, जमादार श्री. राठोड, श्री. शेळके, पोलीस शिपाई, श्री. काकडे, श्री. पांढरपोटे, श्री. घोडके, श्री. पांढरे, श्री. सोनुने, श्री. पवार, श्री. दाभाडे, विनोद वाघमारे यांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल