बलात्कार झाला की खवळून उठते पित्त,

बलात्कार झाला की
खवळून उठते पित्त,
बलात्कार करुन
मारून टाकलं की
सऱ्हास निघतो मार्च,
चौका चौकात
वितळणाऱ्या मेणबत्त्या घेऊन

पिडीतेची जात पाहून
मोर्चे पैदा होतात.
अविवाहित मुलींनी जन्म दिलेल्या अर्भकासारखे
झपाटय़ाने या ही घटना सवयीच्या होऊ लागल्यात.
आपल्या नपुंसक मानसिकतेला

सावलीत जगणारी तमाम माणसं
बंद हाॅल मध्ये ठेवतात एखाद्या छुप्या दारूड्याचं
महिला सबलीकरणावर व्याख्यान ……!
दोन मिनिटे सांगून
एकाच मिनिटात उरकते
भावपूर्ण श्रद्धांजली !!
पुन्हा आम्ही आप आपल्या बिळात जातो सुरक्षित
आणि होतो नामानिराळे

मला माफ करा लेकरांनो ,

मी ही या पैकी वेगळा नाही
फक्त दिवसेंदिवस हे बलात्कार
तुमच्यावर होत नसुन माझ्यातल्या पुरुषोत्वावर
होत आहे आणि दैनिकात पिडीत महिलेच्या
नावा ऐवजी , माझं नाव वाचून मरत चाललो आतल्या आत ……. !!

सुनील दादाराव उबाळे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल