ऑपरेशनही झाले आणि गहाण ठेवलेले मंगळसूत्रही मिळाले लॉ. मनोहर खालापुरे यांचे औदार्य

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर प्रतिनिधी : परतूर – जगात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असताना काही चांगल्या गोष्टीही घडत असतात. माणुसकी अद्याप शिल्लक आहे. ती संपलेली नाही याचा प्रत्यय देणारी घटना शहरातील लॉयन्स क्लबच्या दृष्टी नेत्रालयात पाहावयास मिळाली. घडले ते असे शहरातील वयोवृद्ध आजी रुख्मिनबाई पाईकराव या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी लॉयन्सच्या दृष्टी नेत्रालयात आल्या होत्या. दृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष लॉ. मनोहर खालापुरे हे नेत्रालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. रुख्मिन आजीचीही त्यांनी चौकशी केली. त्यांच्याशी काही वेळ गप्पा मारल्या. त्यातून खालापुरे यांना आजींनी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेऊन ऑपरेशनसाठी पैसे आणल्याचे त्यांना कळाले. खालापुरे यांना ही बाब ऐकून गहिवरून आले.त्यांनी आजीचे ऑपरेशन एक पैसाही न घेता करण्याचा निर्णय घेतला.ऑपरेशननंतर घ्यावी लागणारी औषधीही मोफत दिली.लॉ. खालापुरे यांच्या या कार्याचे आता शहरात कौतुक होत आहे. लॉ. मनोहर खालापुरे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक गरीब व गरजू लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन मोफत केले आहे. वृक्षारोपण, शहर स्वच्छता, आरोग्य शिबिरे इतर अनेक समजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. – अर्जुन पाडेवार, परतूर.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल