यशवंत सेना निर्माण झाली म्हणूनच धनगर जागृत झाला !!!  राष्ट्रीय समाज पक्षापासून धनगर समाज दूर का गेला?

हनुमंत दवंडे

=========================

७० वर्षापासून धनगर समाजाला संविधानात असलेले धनगर आरक्षण का मिळू शकले नाही . राज्यात यशवंत सेने सारखे सामाजिक काम केले नाही. यशवंत सेना विदर्भात आणि मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात पोहचवण्याचे काम आमच्या लोकांनी केले नाही. आपल्याच धनगर कार्यकर्त्यांनी समाजात अनेक सामाजिक संघटना निर्माण केल्या. त्या वेगवेगळ्या नावाने अनेक जिल्ह्यात समाज संघटीत करत होत्या अनेक जिल्हयात धनगर समाज नेते संघटनेचे संस्थापक म्हणूनच काम करत होते. जसे धनगर महासंघ संघटनेचे धनगर नेते मान अण्णासाहेब डांगे साहेब यांचा धनगर महासंघ भाजप मध्ये गेला.

भाजप ने मंत्री पद दिले जेव्हा मान आण्णासाहेब डांगे यांनी धनगर आरक्षण लागु करा अशी मागणी करताच. अण्णासाहेब डांगे यांची साथ भाजप ने सोडली. त्यापूर्वी अनेक दिवस पासूनच आमदार शिवाजीराव शेडगे साहेबाचा धनगर समाज संघटना काँगेस मध्ये गेली. त्यांना ही काँगेस पक्षाने मंत्रिपद दिले. जेव्हां जेव्हा त्यांनी आरक्षण प्रश्न मांडला तेव्हा तेव्हा त्यांचा पक्षाने अपमान केला. नंतर आ.अनंतकुमार पाटील जेव्हा जेव्हां आरक्षण मागितले तेव्हा आमच्या नेत्याना यांनी राजकारणातून हडपर हद्दपार केले तेव्हा त्यांना त्या त्या पक्षाने दूर सारले. नंतर आले महादेव जानकर आले.उत्तमराव जानकर नंतर राम शिंदे नंतर गोपीचंद पडळकर आले आ भदे भरणे नंतर आले. अशी अनेक धनगर नेते पूढे आले येथील राजकीय पार्टीने धनगर समाजातील कोणाला राज्यमंत्री तर कोणाला कॅबिनेट मंत्री केले.

परंतु धनगर जमाती ची मुख्य मागणी आरक्षणाची होती. मंत्रीपद देण्यासाठी नव्हती.

कोणी भाजप तर कोणी काँगेस कडून मंत्रिपदे घेवुन समाजाला वाऱ्यावर सोडुन दिले. महादेव जानकर तेव्हा बहुजन समाज पार्टीत होते. ते राज्याचे बहुजन समाज पार्टी चे उपाध्यक्ष पद सोडुन त्यांनी

सन २००३ नंतर राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. तेव्हा इतर धनगर नेते कोणी काँगेस तर कोणी भाजप मध्ये होते. कोनी शिवसेनेत काम करत होते. त्यामुळे धनगर मताची विभागणी तीन पक्षात झाली. राज्यात धनगर १५ टक्के असूनही प्रत्येक पक्षात दोन ते तीन आमदार चे वर उमेदवार निवडूण आले नाही. भाजप ने धनगरांना आरक्षण देण्याचे लेखी लिहून दिले. धनगरांना आरक्षण देवू. त्या वेळीं भाजप सोबत महादेव जाणकार यांचे राष्ट्रीय समाज पक्षाने युती केली. तेव्हा बहुमताने राज्यात भाजप पक्ष निवडूण आला. त्यांनी धनगर आरक्षण न देता महादेव जानकर यांना मत्री पद दिले. ते मंत्री झाले. राज्यसभेवर मान विकास महात्मे खासदार झाले. परंतु आरक्षण प्रश्न भाजप ने सोडवला नाही.

पाहिले काँगेस पक्षाने ६० वर्षे धनगरांना मतांसाठी फसवले. नंतर भाजप ने १५ वर्षे धनगरांचा मतां साठीवापर केला. समाजतील नेत्याना आरक्षण देवु असे म्हणत फसगत केली. आमचे नेते फसले. नंतर आमच्या समाजाला फसवण्यात आल. काँगेस पक्षाने आणि राष्ट्रवादी पक्षाने आश्वासन देवून धनगर नेते यांना ही फसवले. आज धनगर समाज जागृत झालेला आहे.

काँगेस पक्षाने तर ६० वर्षाच्या वर

धनगर मते घेवून सत्तेचा उपभोग घेतला. समाजातून एक आमदारकीचा फक्त लाभ दिला. हाच फॉर्म्युला भाजपने वापरून धनगर समाजाची फसवणूक केली. त्यामुळं धनगर समाज विदर्भ कोंकण आणि मराठवाडा मधील संपुर्ण समाज नाराज झाला. आणि संघटित झाला.

मग भाजप धनगर नेत्यांनी भाजप सोबत युती केली तेव्हा भाजप आणि शिवसेना धनगरांचे मतांमुळे सत्तेत आला. परन्तु त्यांनीं सुध्दा धनगरांना धोका दिला.

त्यांनी धनगर मतासाठी धोकाधडी चे फसवा फसवी चे राजकारण केले. धनगर समाजाच्या नेत्याला पुढे करूनच सत्ता मिळवली.

 

*बांधवांनो* .

आणि पुढेही असेच सुरू राहणार आहे. म्हणून धनगरांनी राज्यात

शिवसेना भाजप आघाडी

राष्ट्रीय काँगेस राष्ट्रवादी पक्ष

शिंदे सेना आघाडी या राष्ट्रीय पक्षांचे नादाला लागू नये ?

आपण आता नव नवीन पर्याय शोधले पाहिजेत ?

धनगरांना २०२४ चे निवडणूकीत खालील पर्याय आहेत तेचं निवडा.

अन्यथा राज्यात नाही तर देशात तुमचे राजकीय अस्तित्व नष्ट होणार हे मात्र नक्की?

 

राष्ट्रीय समाज पक्ष _पाहिली पसंद

बहुजन समाज पक्ष _दुसरी पसंद

वंचित बहुजन आघाडी_ तिसरी पसंद

ओबीसी आघाडी_ चौथी पसंद

तीसरी आघाडी _ पाचवी पसंद

रीपब्लीकान पार्टी ऑफ इंडिया

आणि अपक्ष.

हीच असली पाहिजे!

सन २०२३ पूर्वी राज्यातील कांग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने धनगर विधानसभा उमेदवारांना जास्त तिकिट दिली नाहीत. ? धनगर बांधवानी विचार करावा!

आणि आमचा लाडका पक्ष

भाजप सुध्दा धनगरांना उमेदवारी दिलेली नाहीं. त्यामुळं धनगर समाजाची आमदाराची संख्या ((ऐक ))ते ((दोन ))वर आली. आहे.

धनगर “समाजाचे” राजकीय अस्तित्व संपल्यात जमा झाले.

धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मराठा समाजातून निवडूण गेलेले आमदार खासदार आणि आदिवासी समाजातुन निवडूण गेलेले२२ आमदार आणि खासदार सतत धनगर विरोधी भूमीका घेतं आहेत ? त्यामुळं धनगरांचा वाली सध्या तरी कोणी नाही !

 

काँगेस पक्षां मधील मराठा आमदार खासदार राष्ट्रवादी पक्षांतील मराठा आमदार खासदार धनगरांचे दुश्मन नंबर ऐक आहेत.

तसेच भाजप आणि शिवसेना मधील मराठा आमदार खासदार धनगरांचे दुश्मन नंबर एक् आहेत ? ते राज्यात धनगर आमदार आणि खासदार यांना कोणताच पक्षात ऐकाही विधानसभा आणि खासदार लोकसभा उमेदवारी मिळू देणारं नाहीत ! जेथे उमेदवार देतील त्याला पाडण्याचे षडयंत्र करतीलच!

हे प्रथम धनगरांनी समजुन घेतले पाहिजे! असे माझे मत आहे?

 

त्याकरीता धनगरांनी आपले मत जे पक्ष धनगरांना जास्त उमेदवारी देतील तो पक्ष आपला. समजावा ! आता

धनगर कोणत्याही पक्षातून उभा असेल तरि त्यालाच मतदान करा? कारण.

आपले आमदार आणि खासदार राज्यात जास्त निवडूण येणारं नाही. तोपर्यंत आपले *राजकिय* वजन वाढणार नाही. अशे मला वाटते?

बांधवानो ”

माझी तुम्हाला विनंती आहे. की

सन २०२४ मध्ये राज्यात कमित कमी धनगरांचे २० खासदार आणि ४० ते ५० आमदार निवडून आलेच पाहिजे ?

असा मनापासून निश्चय करा ?

आणि तेवढेच २० खासदार आणि ५० आमदार मराठा आणि उच्च जातींचे उमेदवारांना पाडावे लागेल?

 

सन २०२४ चे लोकसभा अणि विधानसभा निवडणूकीत.

आणि पिवळा झेंडा विधानसभा आणि लोकसभेत फडकवा !

राखीव मतदार संघात ST राखीव मध्ये आदिवासी आमदार खासदार यांनामतदान करू नका? तेथे नोटा ची बॅटन

दाबा. आदिवासी आमदारांना २०२४ मध्ये मतदान नाही. आणि गावात निवडणुक काळात बंदी चे पोस्टर्स लावा?

उमेदवारी नाही तर मतदान नाही.

असा इशाराही आपल्या धनगर नेत्यांनी . सर्वाच जिल्ह्यातून येथील भाजप -शिवसेना शिंदे -सेना काँगेस राष्ट्रवादी –

या पक्षांना दिला पाहिजे? आपला हा अधीकार आहे. राजकिय हक्क नाही दिला तर आम्ही तुमच्या कडून हिसकावून घेवू ?

 

आमचं या देशात मुस्लिम शासक येण्यापूर्वी आणि आल्यानंतर सुध्दा

आम्ही या देशाचे राज्यकर्ते होतो.

हा आमचा इतिहास आहे.

आणि धनगर या देशात राज्यकर्ती जमात होती.

त्याकरिता समाजाने आपले मत आपल्या माणसाला दिलें पाहिजे!

देशात ओबीसी समाज जागृत झाला.

त्यामुळं तो सुध्दा आपलीं राजकीय भागीदारी मागतो आहे.

आज सगळे ओबीसेचे नेते कार्यकर्ते आणि ओबीसी बांधव आपला पक्ष पाहिजे ? आपण पक्ष काढु अस म्हणत आहेत. त्या सर्वांसाठी तसेच उपेक्षित वंचित समाजासाठी सांगतो आहे की

हीच गोष्ट धनगर नेते मान. महादेव जानकर साहेब यांना सन २००३ साली कळाली म्हणून जानकर साहेब यांनी.

स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली.

त्यावेळी आपल्या समाजातील नेते लोक हासत होतें . आता पक्ष कुठे चालत असतो l

इतर राजकीय पक्ष असताना पक्ष काढायची काय गरज ! धनगर समाजातील नेते काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असतिल किँवा शिवसेना भाजप आघाडी असेल त्या पक्षात मध्ये राहुन.

धनगरांना राज्यभरात ऐक आमदारकी आणि एक् खासदारकी घेंत त्यात तेव्हा. खुश होतें.

दुसऱ्या पक्षात राहून त्यांनी अनेक वर्षे त्यांची गुलामी व लाचारी पत्करुन त्या त्या पक्षाला वाढवत राहीले.?

ऐक म्हण समाजात आहे ती अशी;

आमचे नेते आजपर्यंत अर्ध्या हळकुंडात पिवळे होत होते.

त्यांनी जर अश्या वेळीं राष्ट्रिय समाज पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला असता तर. आपले ३० ते ४० आमदार निवडूण आले असते. आणि राज्यात १० खासदार नक्कीच असते.

ज्या समाजाचेच नेते विकावू असतात त्या समाजात वीकवू माणसे निर्माण होत असतात.?

असे बरेच समाजातील नेत्यांनी हिणवल पण

बांधवानो

विचार करा जानकर साहेब आपल्या पेक्षा 20 वर्षांनी पुढे आहेत 20 वर्षांपूर्वी जानकर साहेब यांच्या लक्षात आले होते.

की माझ्या समाजाला एक दिवस स्वतःचा पक्ष काढल्या शिवाय पर्याय रहाणार नाही.

म्हणून जानकर साहेब यांनी समाजकारण सोडुन राजकारण करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष काढला बांधवानो राष्ट्रीय समाज पक्षाला कमी लेखण्याची चुक आतातरी करु नका राष्ट्रीय समाज पक्ष एक दिवस या देशावर सत्ता स्थापित करणार आहे आपण सर्वांनी राष्ट्रीय समाज पक्षच वाढवावा राष्ट्रीय समाज पक्षा शिवाय दुसरा सक्षम पर्याय असुच शकत नाही ?

धनगरांनी गाव तिथे शाखा काढण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाला मदत करावी ? आपण पुढे या राष्ट्रीय समाज पक्ष गावा गावात वाढवला तरच आपले अस्तित्व टिकेल !

आम्ही सर्व संघटनेत पदाधिकारी तुमचे कार्यकर्ते म्हणून काम करू पण वेळ वाया घालवू नका ?

पटलं तर घ्या.! नाही तर सोडुन द्या 

 

 

????????????????????????????????????

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल