उज्जैनकर फाउंडेशनचे शिव श्रावण धारा ई कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

स्वराज्य वार्ता / किरण पाटील

जळगाव : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे शिव श्रावण धारा ई कवी संमेलन मोठ्या उत्साहात व उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. दिनांक 18 ऑगस्ट रविवारला त्याचप्रमाणे दिनांक 25 ऑगस्ट रविवारला झूम मीटिंग द्वारे या कवी संमेलनाचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. 18 ऑगस्टच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा उत्तर महाराष्ट्र विभागीय सल्लागार नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री प्रा. सौ. सुमतीताई पवार होत्या तर 25 तारखेच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष फाउंडेशनचे राज्य सहसचिव अकोला येथील ज्येष्ठ कवी डॉ. अशोक शिरसाट हे होते .याप्रसंगी या कवी संमेलनाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र सचिव गणेश कोळी यांनी केले तर या कवी संमेलनाचे सुरेल सूत्रसंचालन अमरावती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.मंदाताई नांदुरकर यांनी केले. प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर ,राज्य अध्यक्ष अमरावती येथील डॉ. सतीश तराळ ,राज्य सचिव छत्रपती संभाजी नगर येथील प्रा. डॉ. सुभाष बागल ,राज्य खजिनदार साखरखेर्डा येथील कवी रामदास कोरडे ,गोवा राज्य समन्वयक कवयित्री पौर्णिमा देसाई ,गोवा राज्य संघटक प्रा. डॉ. अनिता तिळवे, कवयित्री माधुरी उसगावकर ,मराठवाडा विभागीय प्रसिद्धी प्रमुख डॉ. मधुकर हुजरे, धाराशिव जिल्हा विधी सल्लागार एडवोकेट कुलकर्णी ,धाराशिव जिल्हा समन्वयक सौ. सरोज कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र विभागीय सल्लागार आळंदी येथील कवयित्री सौ.रूपालीताई चिंचोलीकर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षा सांगली येथील कवयित्री सौ. मेघाताई पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बुडूखले गुरुजी ,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नाशिक येथील प्रा. संदीप गोसावी, नाशिक जिल्हा विभागीय संपर्कप्रमुख विजय सोनवणे साहेब ,विदर्भ विभागीय अध्यक्ष हिवरा आश्रम येथील प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग दैवज्ञ, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार आणि शंकरराव अनासुने, बुलढाणा जिल्हा समन्वयक बाळूभाऊ इटणारे ,बुलढाणा येथील कवयित्री डॉ. मंजूजी जाधव ,जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर पाटील सर,तसेच गणेश कोळी यांच्या मातोश्री सौ. विमलाबाई सूर्यवंशी ,शेगाव येथील कवयित्री जयश्री गीते आदी मान्यवर याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आणि निमंत्रित कवी म्हणून वरील सर्व मान्यवरांनी निसर्ग, नदी, नाले, ऊन, वारा, पाऊस, शेतकरी श्रावण मास यावर भन्नाट कविता सादर करून उपस्थितांनी टाळ्या वाजवून उत्सफूर्त प्रतिसाद दिला. प्रसंगी प्रमुख अतिथी मान्यवरांनी या कवी संमेलनाच्या संदर्भात मनोगत सुद्धा व्यक्त केली शेवटी या कवी संमेलनाचे सुरेल सूत्र संचालक अमरावती येथील डॉ.मंदाताई नांदुरकर यांनी सुद्धा आपली श्रावण मासावर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली त्यानंतर शेवटी या कवी संमेलनाचे अध्यक्ष अकोला येथील डॉ. अशोक शिरसाट यांनी आपले अध्यक्षीय भाषण सादर केले .याप्रसंगी त्यांनी सर्व उपस्थित कवींनी उत्कृष्ट कविता गाऊन उपस्थिताना आनंद देऊन सहभाग नोंदवला .त्याबद्दल त्यांनी सर्व उपस्थित कवींचे मनापासून हार्दिक अभिनंदन केले आणि शेवटी डॉ. अशोक शिरसाठ यांनी आपली श्रावण मासावर आधारित कविता सुद्धा सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या या शिव श्रावण धारा ई कवी संमेलनाचे आभार छत्रपती संभाजी नगर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे यांनी केले. या शिव श्रावण धारा ई कवी संमेलनाचे मुख्य आयोजक तथा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सर्व सन्माननीय पदाधिकारी मान्यवर व सहभागी कवींचे हार्दिक अभिनंदन केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल