स्वराज्य वार्ता / गणेश कोकरे
दौंड : दौंड नगरपरिषदेत तुकाई नगरच्या रहिवाशांचे ठिय्या आंदोलन दौंडच्या तुकाई नगरमधील अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या नागरी समस्यांच्या निषेधार्थ संतप्त रहिवाशांनी दौड़ नगर परिषदेत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्चा प्रमाणात होती. पाणी, रस्ते, वीज, सांडपाणी या मूलभूत हक्कांपासून या भागातील रहिवासी वंचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्या भेडसावत असल्यामुळे वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाला लेखी आणि तोंडी सूचना देऊन देखील आश्वासना पलीकडे काही मिळालेले नाही. नगर परिषदेचे सर्व कर वेळोवेळी आम्ही भरत असतो, मात्र नगरपरिषदेकडून नागरी सुविधा कुठल्याही मिळालेल्या नाही, असा मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांच्यासमोर केला. तुकाई नगर परिसरात ग्राममदैवत तुकाई मातेचे मंदिर आहे. दसऱ्याला पंचक्रोशीतील, ग्रामस्थ देवीला आपट्याच्या पानाचे सोने समर्पित करतात आणि त्यानंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. इतकी धार्मिक परंपरा तुकाई नगरला आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन उदासीन आहे. चिखलाच्या साम्राज्यातून देवीच्या दर्शनाला जावे लागते. पाण्यासाठी चारही दिशा वणवण भटकावे लागते, पथदिवे आणि विद्युत समस्या पाचवीला पुंजलेली आहेत आम्ही देखील माणसे आहोत जनावर नाही, असा संतप्त सवाल महिला आणि पुरुषांनी ठिय्या हिरणा आंदोलनाद्वारे केला . यावेळी माजी नगरसेवक सेवक नंदू पवार सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील अमोल जगताप सनी पालवे राजेश चनुर रतन जाधव चंद्रकांत कांबळे महेश भंडारी रामचंद्र कोकरे राम सुगुर मोहन कंदलगी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






