शेतकरी व युवकांशी संवाद यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद
परतुर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे
काँग्रेसची विचारधारा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारी असून या चळवळीत शेतकरी व आजच्या युवा वर्गाने सहभागी व्हावे अशी साध मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी घातली, आजपासून मतदारसंघात सुरु झालेल्या शेतकरी-युवक संवाद यात्रेत ते बोलत होते. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी पाटोदा येथून श्री गणेशाचे दर्शन घेऊन मा.आ.सुरेशकुमार जेथलीया यांच्या नेतृत्वात शेतकरी व युवकाशी संवाद यात्रेला सुरवात करण्यात आली यावेळी या यात्रेला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शेतकरी व युवकांनी यात सहभाग नोंदवला. आपल्या भावाना व्यक्त करताना मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी पुढे म्हणाले कि खऱ्या अर्थाने लोकशाही टिकून ठेवण्याचे कार्य आजवर काँग्रेस पक्षाने केले होते. मात्र अलीकडे या दहा वर्षाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी आपल्या मनमानी कारभार करत लोकशाही अडचनीत आणली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सर्वसाधारण शेतकरी, शेतमजूर व युवक वर्गासाठी धोरणात्मक निर्णय न घेतल्याने माहागाई, बेरोजगारी व नोकरबंदी असे वाईट दिवस आपल्याला पाहावा लागत आहे. हे सामीकरण बदलासाठी व विशेषकरून आपल्या मतदार संघात खरा विकास, समृद्धी व शेतकरी यांच्यासाठी राज्याच्या विविध योजना खऱ्या अर्थाने राबवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या बाजूने मजबूत उभे रहा असे आहवन त्यांनी यावेळी केले. यावेळी सकाळच्या सत्रात पाटोदा,येनोरा, हातडी, सोयंजना या गावी शेतकऱ्याशी व युवकांशी संवाद साधला तसेच संध्यकाळ च्या सत्रात बाबुलतारा येथे संवाद साधून युवक काँग्रेसची शाखा स्थापन करण्यात आली.तसेच यदलापूर,नांद्रा येथील शेतकऱ्यांशी व युवकांशी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी संवाद साधला. शेतकरी बांधव आणि युवकांन सोबत चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष व मी पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत आहे असे अभिवचन त्यांनी दिले. यावेळी युवा नेते नितीन जेथलिया यांनी देखील शेतकरी व युवकांशी संवाद साधत मतदारसंघात बेरोजगार तरुणांसाठी परतूर औद्योगिक वसाहतीत उद्योग व शेत माल प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले. यावेळी सोबत काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, इंद्रजीतजी घनवट,शामसुंदर काळे, लक्ष्मणराव शिंदे, सुरेशजिजा सवने, मंजुळदास सोळंके, सिध्दू अंभुरे, दिलीप चव्हाण,योगेश पा.आवचार,माऊली तनपुरे,डिगबर इंगळे, प्रविण डुकरे,दत्ता अंभुरे,सचिन बोंबल, शब्बीर भाई,भरत मरळ, रूस्तुम पुंड, यश राठोड,गणेश काळे,सोमनाथ काळे,परमेश्वर बिल्लारे आदी पदाधिकाऱ्याची उपस्तिथी होती.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






