स्वराज्य वार्ता / किरण पाटील
जळगाव : सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात महादेवाची आराधना पूजा केली जाते श्रावण महिन्यात कावड यात्रा काढल्या जातात .श्रावण महिन्याचे औचित्य साधत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .हि कावड यात्रा अंतुर्ली येथे असलेल्या बजरंग चौकातून बजरंग बली च्या मंदिरातून निघून तापी नदीवर नेण्यात आली. यावेळी तापी नदीची व कावड ची पूजा करण्यात आली व कावड मध्ये तापी नदीचे पाणी भरण्यात आले. नंतर ही कावड यात्रा गावातून फिरवण्यात आली गावातून फिरल्यानंतर ही कावड यात्रा पिंपलेश्वर महादेव मंदिर शनी मंदिर इच्छापुर रोड येथे मार्गस्थ झाली .हे या कावड यात्रेचे 2रे वर्ष आहे ही कावड यात्रा गावात फिरल्यानंतर बस स्टैंड वर आल्यानंतर हनुमान चालीसा म्हणण्यात आली.यावेळी भाविक भक्त उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






