नियमितपणे योग्य व्यायाम आणि पौष्टिक आहार घेतल्यास निरोगी आयुष्य मिळेल – सतीश पाटील;

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

आष्टी : परतुर तालुक्यातीलआष्टी येथे आरोग्य शिबीर आणि गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम संपन्न आजच्या स्पर्धेच्या युगात चुकीच्या जीवनशैलीमुळे माणसाला विविध आजारांनी ग्रासले आहे . नियमितपणे व्यायाम आणि योग्य पौष्टिक आहार घेतल्यास निरोगी आयुष्य जगता येईल असा सल्ला आरोग्य सल्लागार सतीश पाटील यांनी केले. स्वातंत्र्य दिन आणि श्रीनाथ डेली नीडस् च्या वर्धापनदिनानिमित्त आष्टी (ता परतुर) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ जाधव,सरपंच मधुकर मोरे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे, डॉ एन के सरकटे, तुकाराम सोळंके, प्रा.राजेश नवल, विष्णू सोळंके, अविनाश इक्कर, मोहन सोळंके, मुरली साखरे, दिलीपराव देशमुख, माऊली सोळंके, नंदकुमार गांजे, उमेश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना सतीश पाटील म्हणाले की प्रत्येक माणूस घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे.मोबाईलच्या अतिरेकामुळे पुरेशी झोप मिळत नाही.त्यामुळे गरजेपेक्षा वजन वाढणे,कमी होणे, बीपी, शुगर, थायरॉईड, मुळव्याध, हार्टअटॅक यासह विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे.

यावेळी मंथन परिक्षेत तालुक्यातून प्रथम आलेली सिद्धी कृष्णा पोटे, प्रगतशील शेतकरी अभिजीत शिंदे, अमोल खरात, आदिनाथ शेंडगे,सोमनाथ गायकवाड, विक्की मोरे, रंगनाथ लहाने, वैभव काटे यांचे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते विष्णू सोळंके यांनी प्रस्ताविक करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठी अशा उपक्रमांचे मागील आठ वर्षांपासून आयोजन करत असल्याचे सांगितले.

अंबादास पौळ यांनी सुत्रसंचलन तर प्रा माऊली गुंजकर यांनी आभार मानले. यावेळी आष्टीसह परिसरातील महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मयुर भुतेकर, जीवन खरात, अविनाश सोळंके, कोंडीबा बरसाले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल