स्वराज्य वार्ता / किरण पाटील
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे भारत देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय, मिठाराम फकीरा तराळ विद्यालय व मंगु रामजी महाजन जुनिअर कॉलेज ,मराठी मुलांची शाळा, मराठी मुलींची शाळा ,उर्दू शाळा, कुसुमताई महाजन इंग्लिश मीडियम स्कूल व अनेक संस्था या ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले .यावेळी मिठाराम फकीरा तराळ विद्यालय व मंगु रामजी महाजन जुनिअर कॉलेज ,मराठी शाळा येथून प्रभात फेरी गावातून काढण्यात आली व नंतर प्रभात फेरी ग्रामपंचायत समोर आली. नंतर ग्रामपंचायत समोर झेंडावंदन ग्रामपंचायत चे प्रभारी सरपंच गणेश भाऊ तराळ यांच्या हस्ते करण्यात आले व नंतर राष्ट्रगीत झाले .राष्ट्रगीता नंतर मराठी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाणे सादर केले व देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केले . ग्रामपंचायत समोर झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष अंतुर्ली ग्रामपंचायत चे प्रभारी सरपंच गणेश भाऊ तराळ हे होते. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केले व देशभक्तीपर गाणे गायले .यावेळी झेंडावंदन कार्यक्रमाप्रसंगी अंतुर्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक ,वेगवेगळ्या संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, कर्मचारी ,वेगवेगळ्या शाळेचे स्टाफ ,विद्यार्थी ,विद्यार्थिनी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. अशा प्रकारे अंतुर्ली गावात भारत देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






