स्वराज्य वार्ता / किरण पाटील
जळगाव : नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकतेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता शिक्षण प्रशिक्षण संदर्भात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .याप्रसंगी शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर येथील शिल्प निदेशक श्री आशिष महाजन यांनी या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या दोन ट्रेड संदर्भात मार्गदर्शन केले .प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी प्रास्ताविकात श्री महाजन यांचा परिचय करून दिला. प्रसंगी श्री महाजन यांनी विद्यार्थ्यांना शासकीय आयटीआय येथिल इलेक्ट्रिशियन व वेल्डर या ट्रेड संदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की, इलेक्ट्रिशियन हे दोन वर्षाचे आहे तर वेल्डर हे एक वर्षाचे आहे, इयत्ता दहावी मध्ये 80 टक्के च्या वर असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष एस.टी. च्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो तीन राऊंड संपल्यानंतर जर काही एस.टी.चे विद्यार्थी मिळाले नाही तर त्या राऊंडला पासून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश दिला जातो यानंतर आपण शासकीय किंवा निमशासकीय ठिकाणी नोकरी सुद्धा प्राप्त करू शकतो किंवा आपण वैयक्तिक आपला व्यवसाय सुद्धा या माध्यमातून करू शकतो असेही ते प्रसंगी म्हणाले .त्याचप्रमाणे त्यांना शासनाकडून पाचशे रुपये विद्यावेतन सुद्धा दरमहा दिले जाते ऑनलाइन अर्ज सुद्धा भरण्याची त्यांनी लिंक विद्यार्थ्यांना दिली यासाठी इयत्ता दहावीचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, डोमेसाईल व नॅशनॅलिटी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र एस.सी. व एस.टी. वगळून नियमानुसार प्रवेश शुल्क आणि पासपोर्ट फोटो अशा प्रकारची माहिती देऊन विद्यार्थ्यांना श्री आशीष महाजन यांनी मार्गदर्शन केले. संगीत यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न सुद्धा विचारले की दहावीनंतर आपण काय करणार कुठल्या ट्रेड संदर्भात विचार करणार, त्याचप्रमाणे कोणत्या नोकरीकडे आपण वळणार मला शासकीय का प्रशासकीय नोकरी पसंत असेल असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले प्रसंगी विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांना चांगला प्रतिसाद दिला.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






