स्वराज्य वार्ता /किरण पाटील जळगाव : अंतुर्ली व परिसरात मोठ्या प्रमाणात केळी लागवड करणारे शेतकरी असून दरोराज मोठ्या प्रमाणात केळी वाहतूक या रस्त्यांवर होत असते. मात्र अनेक वर्षांपासून शेती रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे यांची अवस्था बिकट झालेली होती. ज्या रस्त्याने चालता येत नाही त्या रस्त्याने 15 ते 20 टनाच्या केळी वाहतुक करणाऱ्या गाड्या शेतकऱ्यांच्या बांधावर कशा पोहोचू शकणार. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड तसेच मानसिक ताणाला सामोरे जावे लागत असे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याकडे शेती रस्त्यांच्या मजबुतीकरणाची मागणी केली. त्यावेळी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी शेती रस्त्याच्या निधी मंजुरीच्या किल्ष्ट प्रक्रियेची वाट न पाहता स्वखर्चाने लागलीच शेतकरी हितासाठी शेती रस्त्यांच्या खडीकरणाला सुरवात करून दिली. एकाशेती रस्त्यांच्या कामाला सुरुवात होताच अनेक शेतकरी आमदार साहेबांना भेटून आपाआपल्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात करावी असे निवेदन देत आहेत. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी शेती रस्त्यांच्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन महाराष्ट्र राज्यात एकमेव आमदार म्हणून नाव लौकिक होईल असे कार्य सुरू केले आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






