स्वराज्य वार्ता किरण पाटील मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना रोजगार हमी योजना अंतर्गत विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. तत्पूर्वी टॅबचे देखील प्रत्येक रोजगार सेवकाला वाटप करण्यात आले. येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृह मध्ये रोजगार सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणासाठी संभाजीनगर येथून तंत्रज्ञ सुमित विसपुते उपस्थित होते .याप्रसंगी रोजगार सेवकांना देण्यात आलेल्या टॅब चां वापर कसा करावा व कोणकोणती कामे त्याद्वारे केली जाऊ शकतात या संदर्भात माहिती देण्यात आले. टॅबलेटचा पुरवठा झाल्यानंतर टॅबलेटची हाताळणी टॅबलेट मध्ये इनबिल्ड असलेले सॉफ्टवेअर व एम आय एस रिपोर्ट कशाप्रकारे तयार करण्यात यावे याचे संपूर्ण प्रशिक्षण रोजगार सेवकांना देण्यात आले. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी केले याप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी युवराज आढागळे ,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रवीना तायडे, शुभम तेली, तंत्रज्ञ वैभव राजपूत, संकेत सोनार,सी डी आलोक, मनोज कराड या सहा पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी तालुक्यातील सर्वच रोजगार सेवकांना टॅबचे वितरण करण्यात आले. टॅबलेट मुळे रोजगार सेवकांना स्वतःच्या गावातूनच मस्टर भरणे तसेच हजेरी घेणे यासारखे तांत्रिक कामे सोपे जाणार आहेत.
रवी देशमुख (अध्यक्ष रोजगारसेवक संघटना अध्यक्ष) टॅबलेट मुळे तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टी रोजगार सेवकांना शिकण्यास हातभार लागत असून भविष्यात टॅबलेट मुळे अनेक कामे हे सोपे जाणार आहेत प्रशिक्षणामुळे सर्व रोजगार सेवकांना त्याचा फायदा होणार आहे.
वैभव राजपूत(सहाय्यक तंत्रज्ञ रोहयो.) शासनातर्फे रोजगार सेवकांना उपलब्ध करून देण्यात आलेले टॅबलेट मुळे रोजगार सेवकांची कामे सोपी होणार असून शासनाकडून आलेले विविध कार्यक्रम राबवण्यासाठी प्रशिक्षण देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






