दुचाकी अपघातामुळे युवराज (मामा) भगवान सोनवणे यांचा मृत्यू

स्वराज्य वार्ता /प्रतिनिधी : संतोष सोनवणे

पुणे : पारगाव ता.दौंड येथील कै.युवराज (मामा) भगवान सोनवणे हे पुणे – सोलापूर हायवे लगत असणाऱ्या आनंदग्राम सोसायटी मध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते ते २७ जुलै रोजी सायंकाळी रात्रपाळीच्या ड्युटीवर जात असताना वाखारी (वाकडा पुल) येथे त्यांचा समोरील येणाऱ्या दुचाकीमुळे समोरासमोर अपघात झाला त्यामुळे त्यांच्या डोक्याला जास्त मार बसला व रक्त वाहू लागले. प्रत्यक्षदर्शी जमावांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलवून त्यांना केडगाव येथील वरदविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु काही कारणास्तव त्यांना पिंपरी चिंचवड येथील वाय सी एम रुग्णालयात दाखल करावे लागले परंतु या पाच दिवसांच्या अथक परिश्रमाने त्यांना काही यश आले नाही व त्यांचा तेथेच मृत्यू झाला. तर सोमवार १२ ऑगस्ट २०२४ रोजी तेरावा विधी आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे यांचे ते वडील होत.

.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल