जिजा शिंदे याची महिला शिक्षिकेस अश्लिल भाषेत शिवीगाळ आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल;

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल तर आरोपी झाला फरार जीजा शिंदेला पोलिस अटक करून तुरुंगात टाकतील का असा प्रश्न उपस्थित;

मागील दोन पत्रकारांना जिवेमारण्याच्या धमक्या देवून मारहाण करूनदेखील पोलिस काहीच करू शकले नसल्याने वर्दी पैसा व राजकीय वोझ्या खाली झुकली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परतूर प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आनंदगाव येथे कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेस शाळेवरून परतूरकडे जात असताना आनंदगाव पळशी रस्त्यावर गाडी अडवून त्याच गावातील जिजा यापूर्वी त्यांनी २०१९ पासून सहशिक्षिका म्हणून देखील काम केले आहे, तसेच त्या आनंदगाव येथे मतदान अधिकारी म्हणून काम पाहतात, दि ०२/०८/२४ रोजी ११ वाजेच्या शिक्षिका या आपले कामकाज करत असताना त्याच गावातील नामे जिजा शिंदेवर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये विविध प्रकरणांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. यावरून हा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होत आहे. जिजा शिंदे वर नेमका कुणाचा राजकीय वरहस्त आहे. असे गंभीर गुन्हे घडूनही योग्य शासन होत नसल्यानेच अशी हिंमत दाखवली जाते असे दिसत आहे. शिंदे याने गाडी समोर आडवे उभी करून जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की परतूर तालुक्यातील आनंदगाव या शाळेवर मागील दोन वर्षापासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत तर लिंबाजी उर्फ जिजा रंगनाथ शिंदे हा शाळेवर येऊन शिक्षिकेस म्हणला की तुम्ही शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष शिवकण्या सतीश मोरे यांना शाळेवर येऊ देऊ नका मी मोठा माणूस आहे राजकिय नेत्यांकडे तुमची तक्रार करून तुम्हाला निलंबित करीन, सतीश मोरे याने माझ्या विरोधात ग्रामपंचायत निवडणूकिमध्ये काम केले आहे ते माझ्या विरोधी पक्षाचे आहेत, तुम्ही त्याला समजावून सांगा नसता मी तुमची तक्रार करणार आशा प्रकारे दबाव टाकून धमक्या देत व मोबाईल च्या व्हाट्सअप वरून रात्रीच्या वेळी मॅसेज टाकून सहकारी शिक्षक यांच्या मोबाईल वर फोन लावून देखील धमक्या दिल्या व गावातील लोकांच्या घरी जाण्यास व बोलण्यास देखील मज्जाव केल्याचे फिर्यादीत नमूद केले असून मी यापूर्वी मी पत्रकारांना देखील धमक्या देऊन दांड्याने मारले आहे माझे पोलिस काहीच वाकडे करू शकत नाही मी त्यांना पैसेच्या जोरावर विकत घेतो माझ्या डोक्यावर मोठ्या नेतेचा हात आहे त्या मुळे आष्टी पोलिस देखील माझ्या मागे पुढे करत असतात आणि तुम्ही माझी तक्रार कोठे करणार पोलीसातच ना असे म्हणत धमक्या दिल्या यावेळी रस्त्यावर कुणी नसल्याने शिक्षिका घाबरून गेली आरडा-ओरडा केल्याने जिजा शिंदे बाजूला झाला त्यानंतर शिक्षिकेने झालेला प्रकार आपले पती यांना सांगितला व दि ०५ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार फिर्याद दाखल केली महिला शिक्षिका अनुसूचित जातीतील बौद्ध घटकातील असल्याचे माहिती असून देखील जिजा शिंदे याने शिक्षिकेस रस्त्यावर अडवून जातीवाचक अस्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरोधात भादवी २२१,१२६ (२), कलम ३५१ (२), ३५२ (३), ७९, ३(१) (१) ३, अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९ नुसार गुन्हा नोंदवण्यात येऊन याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड हे करत आहेत, याप्रकरणी परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी दादा हरी चौरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल