स्वराज्य वार्ता / किरण पाटील
जळगाव : नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच 22 जुलै ते 27 जुलै हा शिक्षण सप्ताह वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्रीडा दिन भालाफेक, गोळा फेक, 100 मीटर रनिंग, कबड्डी ,गोळा फेक मध्ये पियुष बडगे, भाला फेक यामध्ये संदेश बडगे तसेच शंभर मीटर रनिंग स्पर्धेत कु. समृद्धी झांबरे, कु. आचल तायडे , कु.प्रिया फुटवाईक या मुलींनी सहभाग नोंदवून विजय मिळवला. त्याचप्रमाणे सांस्कृतिक दिवस म्हणून लोक नृत्य सहभागी विद्यार्थी कु. तमन्ना तडवी, कु.अचल तायडे, कु.शितल चव्हाण, कु. चंचल राठोड, कु. कोमल चव्हाण आदींनी सहभाग नोंदवला त्यानंतर स्पर्श ज्ञानावर आधारित खेळ सुद्धा याप्रसंगी घेण्यात आले. त्यानंतर कौशल्य दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात आला. या वर आधारित विविध तज्ञांचे कौशल्यावर आधारित व्याख्यान सुद्धा प्रोजेक्टर वर दाखवून विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले या शैक्षणिक सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. डी. ठाकूर, ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर, क्रीडा शिक्षक श्री एस. के. पाटील ,श्री एस. एस. नागे ,श्री एस. जी. सोनुणे तसेच शिक्षकेतर श्री विनायक इंगळे ,श्री रघुनाथ इंगळे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन सहकार्य केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






