स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे. परतूर प्रतिनिधी : लोक जनशक्ती पार्टीचे दलित सेना नेते संस्थापक रामविलाजी पासवान माजी केंद्रीय मंत्री. यांच्या प्रेरणेने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या. लोक जनशक्ती पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रमोद मोरे यांची शहराध्यक्ष (पश्चिम) छत्रपती संभाजीनगर पदी निवड करण्यात आली.शिर्डी येथील नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. लोक जनशक्ती पार्टीचे मा.खा. चिरागजी पासवान राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कॅबिनेट अन्न प्रक्रिया मंत्री. व मा. प्रणवजी कुमार राष्ट्रीय अध्यक्ष युवा यांच्या आदेश नुसार नेमणूक करण्यात आली आहे. आपण आपल्या शहरांमध्ये विभागांमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी, संघटन मजबूत, व्यापक, करण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न करून दलित, बहुजन, व अल्पसंख्याकच्या, सामाजिक व आर्थिक प्रश्नांसाठी न्याय मिळवुन देण्याकरिता सदैव तत्पर राहावे असे दिलेल्या निवडी पत्रात म्हटले आहे. यावेळी उपस्थित मा. मोहन अनमोलु प्रदेशाध्यक्ष, राजेश वाहूळ मराठवाडा प्रदेशाध्यक्ष, जानेश्वर भाऊ खरात जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, श्री. राजेश राजपाल घुसर शहर अध्यक्ष (मध्य) छत्रपती संभाजी नगर, जानेश्वर गोरे बीड जिल्हाध्यक्ष, श्री. अश्विन गुडे यांची जिल्हा शहर सचिव छत्रपती संभाजी नगर, अण्णा नरवडे शहर कार्याध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, राहुल गंगावणे शहराध्यक्ष (पूर्व) छत्रपती संभाजीनगर, अशोक काळे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष, आदित्य चौरे अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्ष, प्रदीप गुंडरे अंबाजोगाई शहराध्यक्ष, यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






