स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : परतूर,दि.२४ – विद्यार्थी जीवनात अभ्यासाप्रमाणेच खेळाचेही मोठे महत्व असून खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते असे प्रतिपादन मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांनी केले. शहरातील शिवाजीनगर भागातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षण सप्ताहानिमित्त बुधवारी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. पर्यवेक्षक आर. टी. राऊत, टी. जी. घुगे, क्रीडाविभाग प्रमुख पी. बी. निर्वळ यांची यावेळी उपस्थिती होती. बिरादार सर पुढे म्हणाले की, विद्यार्थी जीवनात जसे अभ्यासाचे महत्व असते तसेच खेळाचे असते. दररोज कुठला ना कुठला तरी खेळ खेळलाच पाहिजे. खेळामुळे मन प्रफुल्लित तर आरोग्य सुदृढ राहते. चांगली शरीर संपत्ती हीच खरी व सर्वोत्तम संपत्ती असते असे ते म्हणाले.क्रीडादिनानिमित्त खो-खो, कब्बडी या व इतर काही स्पर्धा घेण्यात आल्या.या सर्व क्रीडा स्पर्धेत शाळेतील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक कोरके, पवार, वावरे, वखरे, आकात, तनपुरे, आळणे, कामठे, आकणीकर, मगर, भेंडाळकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






