परतूर तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास मोठा प्रतिसाद
परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे
एकदिलाने येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या कामाला लागा, विजय आपलाच निश्चित आहे असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस चे प्रभारी नामदेव पवार यांनी केले.
परतूर तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. येथील कृष्णमोती हॉटेल मध्ये आयोजित या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून परतूर विधानसभा प्रभारी, नामदेवराव पवार तर जिल्हाध्यक्ष, राजेभाऊ देशमुख,माजी.आ. सुरेशकुमार जेथलिया, अन्वरबापू देशमुख ,बाबासाहेब गाडगे,किसनराव मोरे,बाळासाहेब आकात,आर. के.खतीब, एकनाथ कदम, अण्णासाहेब लिपने, अण्णासाहेब खंदारे, नितीनकुमार जेथलिया,सुखलाल राठोड, सुरेश जिजा सवने, माऊली वायाळ, लक्ष्मण शिंदे, संग्राम लोणीकर,माऊली तनपुरे, इंद्रजित घनवट, जगनराव लाटे, पांडुआबा कुरधने, माशाल जमीनदार, हाजी रेहमत, सादेक जहागीरदार, वैजनाथ बागल, दादाराव खोसे, बाजीराव खरात,माऊली तनपुरे, जगनराव लाटे, नगरसेवक बाबुरावजी हिवाळे, सादेक खतीब, सिद्धार्थ बंड, रहेमू कुरेशी,मोईन कुरेशी यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्तिथी होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना नामदेव पवार म्हणाले की,परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेचा बालेकिल्ला असून यात अनेकवेळा काँग्रसला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले पण तरीही जेव्हा जेव्हा एकजुटीने सर्व एकत्र आले तेव्हा काँग्रेसने या ठिकाणी आपला अनेक वेळा दबदबा दाखवला. याच समीकरणात यंदाही महाविकासअघाडी कडून उमेदवारीचा मान हा काँग्रेलाच राहणार असून सर्वांनी ज्या नेत्याला उमेदवारी मिळेल त्याला जिंकून आणण्याचा संकल्प ठेवावा असे आहवन त्यांनी यावेळी केले. यावेळी आपल्या मनोगतात काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांनी म्हनाले कि, काँग्रेस सह महाविकासघाडीचे राज्यात प्रभावी वातावरण असून यावेळी सतांतर निश्चित आहे. महाविकासघाडीची ताकत सत्ताधाऱ्यांना कळली असून त्याचेच उदारण जालना जिल्हाचा खासदार 25 वर्षाचे हुकूमशाही मोडत यावेळी काँग्रेसचा झाला आहे. यामुळे परतूर, मंठा मतदार संघाततून काँग्रेस उमेदवारालाच महाविकासआघाडी कडून उमेदवारीची संधी मिळणार यात कुठलीच शंका नसल्याचे ते म्हणाले. जालना खासदार प्रमाणे परतूर मतदार संघात पण काँग्रेस महाविकासआघाडीचे वैभव आपण पुन्हा खेचून आणू असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांना संभोधित करताना मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी उपस्तितीथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानत हा कार्यकर्ताच माझी ताकद आहे असे भावनिक उदगार काढले. पुढे बोलताना जेथलिया यांनी म्हटले कि गेली दहा वर्ष सत्तेत नसतानाही कितीही अडचणी आल्या तरी कार्यकर्त्यांनी माझी कधीच साथ सोडली नाही.तर माझ्या या राजकीय कारकिर्दीत माझ्या खांद्याला खान्दा लावत कार्यकर्त्यांनी काँग्रेस वाढीचे कार्य करत राहिले. यामुळेच विरोधी बाकावर असतानाही अनेक स्थानिक स्वराज्य सस्था, ग्रामपंचायतीवर आज काँग्रेस चे वर्चस्व आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे अनुकूल वातावरण कायम ठेवत बूथ कमिटी रचना व प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत कार्य करण्याचे आवाहन केले.काँग्रेस महाविकासआघाडीहा गड निश्चित जिंकेल अशा भावना व्यक्त करत, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मी नेहमी तत्पर भूमिका बाजावत राहील असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. सदरील मेळाव्यात प्रस्ताविक युवानेते नितीनकुमार जेथलिया यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे व आभार बाबासाहेब गाडगे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तालुक्यातील काँग्रेसपक्षाचे विकास खुळे, पंजाब देशमुख,विष्णू तनपुरे,सचिन लिपने,पांडुरंग गाडगे, मंजुळदास सोळंके, सिद्धेश्वर अंभुरे, राजाराम गाढवे,अविनाश शहाणे,जफर पटेल, जफर कायमखानी, अजीम कुरेशी, मोसीन जमीनदार,बाळू काका ढवळे,अझर भाई, डॉ.केशरखाणे, कलीम शेख,लुकमान कुरेशी, अविनाश खरात,सचिन बोबले,सोनू धुमाळ, अंनता भारसाकळे, मनोज कऱ्हाळे, अंकुश आढे,शेख आरेफ, महेश राठोड,सारिकाताई वरनकर,उर्मिलाताई खाडे,अलकाताई कोळे, स्वातीताई दवंडे, कांताबाई शेजूळ,भगवान आघाव, विलास तरवटे,शिवाजीराव नळगे, मनोज कऱ्हाळे, लक्ष्मण खोत,आजी-माजी पदाधिकारी, सहकारी,महिला आघाडी व कार्यकर्त्यांची उपस्तिथी होती.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






